राज्यातील आरटीई (RTE) २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निकाल लॉटरी 6 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली असून, पहिल्या फेरीतील निवड झालेल्या मुलांना SMS प्राप्त झाले आहेत. आता प्रतीक्षा यादीतील म्हणजेच दुसरी निवड यादी जाहीर करण्यात आली असून, निवड झालेल्या मुलांच्या पालकांना मोबाईल क्रमांकावर SMS पाठविण्यात आले आहे. जर SMS मिळाला नसेल तर तुम्ही अर्जाची स्थिती येथे चेक करू शकता.
‘आरटीई’ प्रवेश प्रतीक्षा यादीतील मुलांना SMS
यंदा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा राज्यभरातील ८,७०१ शाळांमध्ये १,१४,८२६ रिक्त जागा उपलब्ध होत्या, ज्यासाठी तब्बल २,८९,२८९ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरले आहेत.
आरटीई प्रवेशाच्या रिक्त जागेसाठी मूळ निवड यादी (Regular Selection List) १० एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या पालकांच्या पाल्यांची निवड झाली, त्यांना अर्जात नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर १० एप्रिल २०२६ पासून एसएमएस (SMS) पाठविण्यात आले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी १० एप्रिल ते 8 मे 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
आता ही मुदत संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील निवड यादी 15 मे 2026 रोजी प्रसिद्ध केली असून, निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी मिळणार आहे.
‘आरटीई’ ऑनलाईन प्रवेशाचे मोबाईलवर SMS न आल्यास काय करावे?
SMS ची वाट न पाहता प्रतीक्षा यादीतील मुलांच्या पालकांनी 15 मे पासून आरटीईच्या अधिकृत वेबसाईटवर https://student.maharashtra.gov.in/adm_portal/ ‘Application wise details’ या टॅबवर क्लिक करावे. तिथे आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे की नाही, याची खात्री करावी.
लॉटरी लागली असल्यास, वेबसाईटवर लॉगिन करून ‘Admit Card‘ या टॅबवर क्लिक करावे आणि मिळालेल्या शाळेचे ‘Allotment Letter’ प्रिंट करून घ्यावे. जर पासवर्ड विसरला असाल, तर ‘Recover Password’ चा वापर करून तो रिसेट करता येईल.
ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन आपल्या विभागातील ‘पडताळणी समिती’कडे जावे. पडताळणी समितीच्या पत्त्यांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अॅडमिट कार्ड वर देखील पत्ता नमूद असतो.
पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून ऑलॉटमेंट लेटरवर स्वाक्षरी आणि शिक्का घेणे अनिवार्य आहे. समितीच्या मान्यतेशिवाय शाळेत प्रवेश निश्चित होणार नाही. समितीचा शिक्का मिळाल्यानंतरच विहित मुदतीत शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.
पालकांनी आपला अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत स्वतःजवळ जपून ठेवावी, जेणेकरून प्रवेशावेळी कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.
सुधारित वेळापत्रक पाहा
- RTE Lottery Regular Selection List 2 Date: 15/05/2026
- Admission Regular List 2 Last Date: 26/05/2026
- RTE 2nd Lottery Regular Selection List 2 Date : 15/05/2026
RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाचे नियम
पालकांनी प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारेच लॉटरी काढली गेली असल्याने, आता कागदपत्रांची पडताळणी समिती कडे व्हेरिफाय करणे अनिवार्य आहे. जर लॉटरी लागूनही आवश्यक मूळ कागदपत्रे उपलब्ध नसतील, तर प्रवेश रद्द होऊ शकतो. सन २०२६-२७ या वर्षासाठी निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य धरले जाणार नाही, याची पालकांनी नोंद घ्यावी. तसेच, जर निवासी पुराव्यासाठी बँकेचे पासबुक दिले जाणार असेल, तर केवळ राष्ट्रीयीकृत बँकेचेच पासबुक स्वीकारले जाईल.
अधिक माहितीसाठी RTE प्रवेश प्रक्रियेच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.









