Raghoji Bhangre Gunagaurav Yojana 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावी (कला, वाणिज्य, विज्ञान) मधील प्रत्येकी पहिल्या पाच गुणवंत मुला-मुलींना राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर सन्मानित केले जाणार आहे. या योजनेतून पात्र गुणवंत विद्यार्थ्यांना 5 ते 30 हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया.
Raghoji Bhangre Gunagaurav Yojana संपूर्ण माहिती
योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये गुणवत्तेची आवड निर्माण करणे हा आहे.
Raghoji Bhangre Gunagaurav Yojana आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर सत्कार करून त्यांना 5 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस दिले जाणार आहे.
दहावी आणि बारावी (कला, वाणिज्य, विज्ञान) मधील प्रत्येकी पहिल्या पाच गुणवंत मुला-मुलींना खालील प्रमाणे रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रोख बक्षीस तपशील
- राज्यस्तर:
- प्रथम क्रमांक: ३०,००० रुपये
- द्वितीय क्रमांक: २५,००० रुपये
- तृतीय क्रमांक: २०,००० रुपये
- चतुर्थ क्रमांक: १५,००० रुपये
- पाचवा क्रमांक: १०,००० रुपये
- अपर आयुक्त स्तर:
- प्रथम क्रमांक: १५,००० रुपये
- द्वितीय क्रमांक: १०,००० रुपये
- तृतीय क्रमांक: ७,००० रुपये
- प्रकल्प कार्यालय स्तर:
- प्रथम क्रमांक: १०,००० रुपये
- द्वितीय क्रमांक: ७,००० रुपये
- तृतीय क्रमांक: ५,००० रुपये
याव्यतिरिक्त, राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातील प्रत्येकी २४ गुणवंतांना दहा महिन्यांसाठी प्रतिमाह एक हजार रुपये अनुदान दिले जाईल. अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या तीन मुला-मुलींना सन्मानित केले जाईल.
या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार
Raghoji Bhangre Gunagaurav Yojana राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल चालविले जातात. यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीसह बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी पाच गुणवंत मुला-मुलींना पारितोषिक दिले जाणार आहे.
आश्रमशाळांचाही सन्मान
100 टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचाही या योजनेअंतर्गत विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामुळे आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देईल, अशी आशा आहे.
अधिक माहितीसाठी आदिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य https://tribal.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.