MAHA TET 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Published On: April 18, 2026
Follow Us
MAHA TET Exam Date 2026 Maharashtra

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026 संदर्भात महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही परीक्षा अनिवार्य असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 27 मार्च 2026 पासून सुरू झाली असून, आता अर्ज करण्यासाठी 24 एप्रिल 2026 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

MAHA TET Exam Date 2026 Maharashtra

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये MAHA TET 2026 परीक्षा रविवार, दि. 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे.

ही परीक्षा इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर 1) आणि इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर 2) या स्तरांवरील शिक्षक पदांसाठी आवश्यक आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक किंवा शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया 27 मार्च 2026 पासून सुरू होणार असून 24 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

प्रवेशपत्र 9 जून 2026 पासून अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून परीक्षार्थ्यांनी 21 जून 2026 पर्यंत ते डाउनलोड करणे आवश्यक आहे.

MAHA TET Jun Exam Date 2026 परीक्षा वेळापत्रक

  • पेपर 1 (इ. 1 ली ते 5 वी): 21 जून 2026 | सकाळी 10:30 ते दुपारी 1:00
  • पेपर 2 (इ. 6 वी ते 8 वी): 21 जून 2026 | दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:00

परीक्षेच्या वेळापत्रकात प्रशासकीय कारणांमुळे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे https://mscepune.in/https://mahatet.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती तपासावी.

MAHA TET Exam ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

MAHA TET Jun Exam Date 2026

TET शिक्षक पात्रता परीक्षा अपडेट्स

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment