शिक्षण सेवक योजनेत राज्य शासनाचा मोठा बदल! जुनी सेवा आता नवीन नियुक्तीत ग्राह्य धरणार

Published On: February 20, 2026
Follow Us
Shikshan Sevak Rules in maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षण सेवक (Shikshan Sevak) योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. हा शिक्षण सेवक शासन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षण सेवकांसाठी लागू आहे. या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना प्रत्यक्ष दिलासा मिळाला आहे.

पार्श्वभूमी : शिक्षण सेवक नियमावली काय सांगते? | Shikshan Sevak Rules

राज्यात सन २००० पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांमध्ये (ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालये इत्यादींचा समावेश आहे) शिक्षण सेवक योजना लागू आहे. शिक्षण सेवक नियमावली नुसार, उमेदवारांना सुरुवातीची तीन वर्षे मानधन तत्त्वावर काम करावे लागते आणि त्यानंतर सेवा समाधानकारक असल्यास त्यांची सेवा नियमित करून वेतनश्रेणी लागू केली जाते.

परंतु, जुन्या नियमानुसार एक मोठी अडचण होती. जर एखाद्या उमेदवाराने शिक्षण सेवक म्हणून काही काळ काम केले आणि त्याच तीन वर्षांच्या काळात त्याची दुसऱ्या समान किंवा वेगळ्या शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्ती झाली, तर अशा व्यक्तीला पुन्हा पहिल्यापासून तीन वर्षांचा काळ पूर्ण करावा लागत असे. पूर्वीच्या पदावरील त्याची सेवा नवीन पदासाठी विचारात घेतली जात नव्हती. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून उच्च स्तरावर नियुक्ती मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी ही बाब अन्यायकारक होती.

नवीन शासन निर्णयात काय बदल?

ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने शिक्षण सेवक (Shikshan Sevak) योजनेत अत्यंत सकारात्मक सुधारणा केली आहे. नवीन निर्णयानुसार, कोणत्याही स्तरातील किंवा माध्यमातील शाळेत नव्याने नियुक्ती झाल्यास, उमेदवाराला नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पूर्ण तीन वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही.

पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर व्यतीत केलेला काळ नवीन नियुक्तीमध्ये विचारात घेतला जाईल आणि केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन पदावर काम करावे लागेल.

हा लाभ कोणाला मिळेल?

सध्या कार्यरत असणारे उमेदवार: हा निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास (१८ फेब्रुवारी २०२६) ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे, केवळ त्यांनाच या लाभाचा फायदा घेता येईल.

जुन्या उमेदवारांना लाभ नाही: ज्यांचा कालावधी या तारखेपूर्वीच पूर्ण होऊन त्यांना नियमित नियुक्ती मिळाली आहे, अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही.

थेट नियमित वेतनश्रेणी: जर एखाद्या उमेदवाराची पूर्वीची सेवा आणि सध्या कार्यरत असलेल्या पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा एकूण कालावधी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला असेल, तर अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक (Shikshan Sevak) कालावधी या निर्णयाच्या तारखेलाच संपुष्टात येईल व त्याला थेट नियमित वेतनश्रेणी अनुज्ञेय ठरेल.

अधिक माहितीसाठी : शिक्षण सेवक योजना सुधारित शासन निर्णय निर्गमित

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Janganana Employees Leave Latest Circular

जनगणना 2027: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द? परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश जारी

March 7, 2026
Shalarth Thakit Bill

Shalarth Thakit Bill: थकित देयके या तारखेपर्यंत निकाली निघणार, थकीत बिल किती मिळणार? चेक करा

March 5, 2026
Kendrapramukh Bhrati

केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकालाची तारीख जाहीर? शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती

March 4, 2026
shikshaketar karmchari gazette 2026

राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी पात्रता बदलली! महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध

March 3, 2026
PM POSHAN aahar mandhan gr

PM POSHAN अंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांना वाढीव मानधनाचा लाभ मंजूर, शासन निर्णय जारी

March 3, 2026

शिक्षकांचे अशैक्षणिक कामातून सुटका होणार? शालेय शिक्षण राज्यमंत्री यांची विधानपरिषदेत माहिती

February 25, 2026

Leave a Comment