राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी काढा – महिला व बालविकास मंत्री

By Marathi Alert

Updated on:

Anganwadi Sevika Latest News : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित प्रकरणाविषयी मंत्रालय येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न झाली, यावेळी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या LIC कडील प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार

Anganwadi Emplyoees Latest News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या कर्मचाऱ्यांच्या LIC कडील प्रलंबित एकरकमी लाभा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयातील दालनात संपन्न झाली, यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी महिला बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास योजने आयुक्त संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एकरकमी लाभ दिला जातो.

दिनांक १ एप्रिल २०२२ पासूनच्या प्रलंबित प्रस्तावांसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. याबाबतची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.

पदोन्नती संदर्भात शिक्षण संचालनालयाने दिले महत्वाचे निर्देश

अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी, पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू

अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना (Pension scheme) लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच या कर्मचाऱ्याना Gratuity देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याबरोबरच कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, सविस्तर तपशील जाणून घ्या..

खुशखबर… रखडलेली शिक्षक भरती सुरू 

Leave a Comment