Lak Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, सविस्तर तपशील जाणून घ्या..

By Marathi Alert

Updated on:

Lek Ladki Yojana Maharashtra 2024: राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येत आहे, गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेमध्ये मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया…

लेक लाडकी योजनेचा उद्देश | Lek Ladki Yojana 2024

राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ (Lek Ladki Yojana 2024) ही योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lak Ladki Yojana 2024: मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेतून आतापर्यंत १८ हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून, ३८ हजार लाभार्थी प्रक्रियेत आहेत. त्यांनाही लवकरच लाभ मिळेल. परंतू या योजनेची अधिक जनजागृती करून या योजनेला गती द्यावी, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

lek ladki yojana meeting aditi tatkare

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची बैठक संपन्न

लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, किती मिळणार लाभ?

लेक लाडकी या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लेक लाडकी योजना नव्या स्वरुपात राबविणार

महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात सद्यःस्थितीत सुधारित ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना दि. १ ऑगस्ट २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेत दरवर्षी सुमारे ५००० लाभार्थी पात्र ठरत होते. त्याकरिता वार्षिक सुमारे १२ कोटी एवढा खर्च येत होता.आता ही योजना बंद होणार असून नव्या स्वरूपात ‘Lek Ladki Yojana’ राबविण्यात येत आहे.

लेक लाडकी योजना आवश्यक पात्रता | Lake Ladaki Scheme Eligibility

  1. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
  2. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.
  3. १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
  4. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा

लेक लाडकी योजनेचा लाभ थेट खात्यात जमा होणार

शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फ़त करण्याकरिता पोर्टल तयार करून त्याकरिता तसेच योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालयस्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. त्यामध्ये तांत्रिक मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व तदनुषंगिक प्रशासकीय खर्च भागविण्याकरिता आवश्यकतेनुसार येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी फॉर्म मागे ‘इतके’ रुपये मिळणार

लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय व अर्ज नमुना Lek Ladki Yojana Form

लेक लाडकी योजनेसाठी अर्जाचा नमुना व सविस्तर तपशील अधिकृत शासन निर्णयात पहा – डाउनलोड करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ‘सुधारित’ शासन निर्णय सविस्तर संपूर्ण माहिती

Leave a Comment