Mukhyamantri Majhi Ladki Bahin: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात दि. 5 जुलै रोजी मंत्रालयात मंत्री कु.तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, या बैठकीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात बैठक संपन्न
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समाजातल्या शेवटच्या घटकातील महिला भगिंनीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहे.
या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पवार उपस्थित होते. तर दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाडी केंद्रात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे परिपूर्ण, माहितीचे फलक लावण्याचे निर्देश
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेचे परिपूर्ण, माहितीचे फलक लावावेत, जेणेकरुन सर्व महिलांना योजनेसंदर्भातील पात्र-अपात्रतेचे निकष समजतील, अशा पद्धतीने नियोजन करुन घ्यावे.
अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफलाईन फार्म भरुन घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेवू नयेत, याबाबतच्या सूचना विभागाकडून देण्यात याव्यात. तालुका गावपातळीवर प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा व्हॉटस्अप ग्रुप तयार करुन त्या ग्रुपवर या योजनेची सविस्तर माहिती द्यावी.
प्रत्येक अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे 50 रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार होणार नाही याची दक्षताही घेण्यात घ्यावी, असेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले. (प्रोत्साहन भत्ता बाबत शासन निर्णय)
राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन व भत्त्यांमध्ये भरघोस वाढ!
अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना ऑनलाईन प्रशिक्षण
गावस्तरावर तसेच तालुकास्तरावर संबंधित घटकांचे सहकार्य घेवून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन करुन त्या म्हणाल्या की, सकाळी 4 तास अंगणवाडी सुरु असते. त्यानंतर एका तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देण्यात यावे. सर्वांनी एकमेकांच्या समन्वयाने ही योजना यशस्विपणे राबवण्याची सूचना ही यावेळी त्यांनी दिल्या.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करुन घ्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
या योजनेचा फॉर्म भरताना कोणत्याच अर्जदाराकडून पैसे न घेण्याचे व असे प्रकार एखाद्या ठिकाणी घडत असतील तर ते निदर्शनास आणून देत त्यावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश या बैठकीत दिले.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी काढा – महिला व बालविकास मंत्री