राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

By Marathi Alert

Updated on:

Employees Salary Allowances Increase: राज्यातील ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात आली असल्याची माहिती, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत निर्णय!

सह्याद्री अतिथी गृह येथे दिनांक 7 जुलै 2024 रोजी ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या बाबत झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय!

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन व सर्व भत्त्यांमध्ये मोठी वाढ | Employees Salary Allowances Increase

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात (Increase In Basic Salary) मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्यामध्ये (Increase Allowances) 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा रू.500/- चा भत्ता रु.1000/- इतका करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट

Leave a Comment