‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘तीन’ मोठे बदल! Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

By Marathi Alert

Updated on:

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात दोन महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहे, घेतलेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘हे’ मोठे बदल!

अडीच लाख (2.5 Lakh) रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ‘सुधारित’ शासन निर्णय सविस्तर संपूर्ण माहिती

वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा निर्णय

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगटऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये सुधारणा होणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना सहज-सुलभपणे मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी शिथील करण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा रु. १५०० आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती, सविस्तर तपशील जाणून घ्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर, त्या ऐवजी १५ वर्षांपूर्वीचे खालील कागदपत्रे

  1. रेशन कार्ड
  2. मतदार ओळखपत्र
  3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  4. जन्म दाखला

या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता सदर योजनेत लाभार्थी महिलांचं वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर, अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

‘प्रधानमंत्री मातृवंदना सुधारित योजना 2.0’ राज्यात लागू

Leave a Comment