Kendrapramukh Exam Hall Ticket Download: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (mscepune) यांनी’समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५’ चे अधिकृत वेळापत्रक आणि हॉल तिकीट बाबतची अधिकृत लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Kendrapramukh Exam New Update
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी 1800 222 366 / 1800 103 4566 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा व https://cgrs.ibps.in/ या लिंक वर तक्रार नोंदवावी. प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन आयडी (Registration No) आवेदनपत्रावर उपलब्ध आहे. तसेच पासवर्ड हा संबंधित उमेदवाराची आवेदनपत्रावरील जन्मतारीख आहे. असे mscepune कडून जाहीर करण्यात आले आहे.
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची वेबलिंक दि. २८/०१/२०२६ पासून देण्यात आली आहे. तरी सर्व उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध ( डाउनलोड ) करून घ्यावे.
ज्या 12 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद /पंचायत समिती निवडणुका 7 फेब्रुवारी 2026 रोजी आहेत, अशा बारा जिल्ह्यांमधील केंद्रप्रमुख परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवार शिक्षकांची परीक्षा ही 3 फेब्रुवारी,2026 रोजी होणार आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षक उमेदवारांना चार तारखेला निवडणूक कर्तव्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. असे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.
लेटेस्ट अपडेट: केंद्रप्रमुख परीक्षा 2026 संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नवीन आदेश जारी
केंद्रप्रमुख भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | Kendrapramukh Exam Date
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदी नियुक्ती देण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
Kendrapramukh Exam Date: केंद्रप्रमुख पदासाठी परीक्षा दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ आणि ०४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन प्रत्येकी सत्रात आयोजित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही परीक्षा वरील दोन्ही दिवशी प्रत्येकी तीन सत्रामध्ये (Sessions) पार पडणार आहे . त्यामुळे उमेदवारांनी आपल्या बॅचची वेळ आणि दिनांक हॉल तिकीट आल्यावर काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे.
केंद्रप्रमुख भरती परीक्षा अधिकृत प्रश्नपत्रिका स्वरूप, अभ्यासक्रम आणि शेवटच्या क्षणी रिव्हिजन टिप्स
केंद्रप्रमुख भरती परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना आपले प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. परिषदेने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांच्या लॉगिनमध्ये हे प्रवेशपत्र डाउनलोड करता येत आहे.
त्यामुळे उमेदवारांनी (Kendrapramukh Exam Hall Ticket Download) करण्यासाठी आपले लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरुन खाली दिलेल्या लिंकवर हॉल तिकीट वैयक्तिक लॉगिन मधून डाऊनलोड करून घ्यावे.
केंद्रप्रमुख भरती अधिसूचना, पात्रता, अभ्यासक्रम, जिल्हा निहाय रिक्त जागा, संपूर्ण माहिती
Kendrapramukh Exam Hall Ticket Download
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वप्रथम उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी .
स्टेप 2: परीक्षेची लिंक शोधा वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर किंवा ‘महत्वाच्या लिंक’ या सेक्शनमध्ये “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या नावाने एक स्वतंत्र लिंक किंवा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा.
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/oecla_jan26/login.php?appid=3c65be7a65d2e51e2f011e327cdb21ed
स्टेप 3: कॅन्डीडेट लॉगिन (Candidate Login) प्रेस नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, प्रवेशपत्र हे परीक्षार्थी/उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे . त्यामुळे तुम्हाला ‘Candidate Login’ किंवा ‘Login’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 4: माहिती भरा (Login Details) लॉगिन करण्यासाठी तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल (साधारणपणे): रजिस्ट्रेशन नंबर / ॲप्लिकेशन आयडी (Registration No.) पासवर्ड (Password) किंवा जन्मतारीख (DOB) ही माहिती भरून ‘Submit’ किंवा ‘Login’ बटणावर क्लिक करा.
स्टेप 5: हॉल तिकीट डाउनलोड आणि प्रिंट लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्डवर Admit Card किंवा Hall Ticket असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून हॉल तिकीट स्क्रीनवर तपासा आणि त्याची प्रिंट (Print) काढून घ्या.
परीक्षेच्या तारखा: तुमची परीक्षा ०३/०२/२०२६ किंवा ०४/०२/२०२६ यापैकी एका दिवशी असेल, तारीख आणि सत्र (Session) हॉल तिकीटवर तपासा .
सध्याची स्थिती: हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होणार आहे, त्यामुळे वेबसाईट चेक करत राहा. Kendrapramukh Hall Ticket 2026 Direct Link Active
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि इतर सूचनांसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Kendrapramukh Exam Hall Ticket Download) ची लिंक ॲक्टिव्ह होताच शिक्षकांनी वेळेवर आपले हॉल तिकीट काढून घ्यावे, जेणेकरून आयत्या वेळी गोंधळ होणार नाही.
ही परीक्षा जिल्हा परिषद शिक्षकांसाठी पदोन्नतीची एक मोठी संधी असल्याने, ०३ आणि ०४ फेब्रुवारी २०२६ या तारखा लक्षात ठेवून आपली तयारी पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख परीक्षा वेळापत्रक आणि हॉल तिकीट प्रसिद्धी पत्रक डाउनलोड करा.








