DCPS NPS Latest Update Maharashtra: राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियमांमध्ये मोठे बदल!

By Marathi Alert

Published on:

DCPS NPS Latest Update Maharashtra : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS) अंतर्गत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार, 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर राज्य सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नवी तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

मुख्य निर्णय आणि सुधारणा

  1. सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास:
  1. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी:
  • निवृत्ती उपदान आणि वैद्यकीय निवृत्ती अनुदान लागू.
  • शासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळणार.
  1. अनुदान धोरणातील सुधारणा:
  • पूर्वीच्या योजनांमध्ये सुधारणा करून नवीन धोरण लागू.
  • याआधी मंजूर असलेली सानुग्रह अनुदान योजना रद्द करण्यात आली आहे.
  1. शासन निर्णयाची अंमलबजावणी:
  • सर्व संबंधित प्रशासनांना लवकरात लवकर ही योजना लागू करण्याचे आदेश.
  • जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार.

जुनी पेन्शन योजनेसाठी उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुड न्यूज! राज्य वेतनस्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी; बक्षी समिती अहवाल खंड 2 स्वीकृत शासन निर्णय

DCPS/NPS योजनेतील महत्त्वाचे बदल:

एमपीएससीच्या परीक्षा आता मराठीतून होणार, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

शासन शुध्दीपत्रक दिनांक २४ फेब्रुवारी २०२५

शासन निर्णय दि. १४.६.२०२३ परिच्छेद क्र.१ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
दिनांक १४ जून २०२३ रोजीच्या GR मध्ये काय आहे?

दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा – याऐवजी पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.

दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजीचा शासन निर्णय नुसार खालीलप्रमाणे सुधारणे करण्यात आली आहे.

DCPS NPS Latest Update Maharashtra

दिनांक ०१/११/२००५ रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक / उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतूदी लागू असलेल्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येतील.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

Leave a Comment

error: Content is protected !!