HRA Calculation Rates In Maharashtra : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (DA) ५० टक्क्यावरून ५३ % इतकी वाढ करण्यात आली आहे. आता या वाढीमुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) मध्ये देखील वाढ लागू झाली आहे.
Table of Contents
सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर
महाराष्ट्र शासनाने राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दराने घरभाडे भत्ता (HRA) मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, तो 1 जानेवारी 2019 पासून लागू झाला आहे.
त्यानुसार Government Employees यांच्या महागाई भत्ता (DA) वाढीच्या दरानुसार HRA मध्ये देखील वाढ करण्याबाबत घरभाडे (HRA) सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.
DA Calculator : महागाई भत्ता कॅल्क्युलेटर, तुमचा पगार तपासा!
घरभाडे भत्त्याचे नवे दर – HRA Rates
महाराष्ट्र राज्य शासनाने X, Y, Z वर्गातील शहरे आणि गावे यांच्यासाठी सुधारित दर (HRA Rates) निश्चित केले आहेत.
शहर वर्गीकरण | मागील दर (वेतनाच्या टक्केवारीत) | सुधारित दर (वेतनाच्या टक्केवारीत) |
---|---|---|
X (मोठी शहरे) | 30% | 24% |
Y (मध्यम शहरं) | 20% | 16% |
Z (लहान शहरं आणि गावे) | 10% | 8% |
HRA Calculation Rates In Maharashtra
➡ तसेच X, Y, Z वर्गातील शहरांसाठी किमान HRA खालीलप्रमाणे असेल:
✔ X वर्ग शहरं – ₹5400
✔ Y वर्ग शहरं – ₹3600
✔ Z वर्ग शहरं – ₹1800
महागाई भत्त्याशी (DA) संलग्न HRA सुधारित दर
महागाई भत्ता (DA) 25% च्या वर गेल्यास HRA मध्ये वाढ
सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता (DA) 25% च्या वर गेल्यास HRA मध्ये वाढ केली जाणार आहे:
✅ X वर्ग शहरं – 27%
✅ Y वर्ग शहरं – 18%
✅ Z वर्ग शहरं – 9%
महागाई भत्ता 50% च्या वर गेल्यास HRA सुधारित दर
सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना ५३ टक्के दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात आला असून आता खालीलप्रमाणे घरभाडे HRA सुधारित दर लागू होईल.
महागाई भत्ता 50% च्या वर गेल्यास HRA पुढीलप्रमाणे वाढेल:
✅ X वर्ग शहरं – 30%
✅ Y वर्ग शहरं – 20%
✅ Z वर्ग शहरं – 10%
वाढीव दरानुसार चेक करा तुमचा पगार -महागाई भत्ता कॅल्क्युलेटर
महागाई भत्ता : 7th, 6th, 5th आयोगानुसार तीन शासन निर्णय येथे पाहा
महत्वाच्या अटी आणि नियम
- घरभाडे भत्त्याच्या हिशोबात “विशेष वेतन” समाविष्ट होणार नाही.
- हा निर्णय 1 जानेवारी 2019 पासून अंमलात आला आहे आणि याचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
X Y Z Cities For HRA
केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतर पात्र लाभार्थ्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) मंजूर करण्यासाठी शहरे आणि गावे विविध (X Y Z Cities) वर्गांमध्ये विभागली गेली आहेत. केंद्र शासनाच्या सुधारित निकषांनुसार, राज्य शासनाने देखील आपले वर्गीकरण पुनरावलोकन करून सुधारित केले आहे.
खुशखबर! राज्यातील लाखो निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा! महागाई भत्त्यात भरघोस वाढ!
X Y Z Cities in Maharashtra

X Y Z Cities For HRA in Maharashtra : PDF Download Here
X Y Z Cities For HRA PDF
घरभाडे भत्त्याचे नवे दर: ✔ X वर्ग शहरांसाठी: 24% (मागील 30% वरून कमी) ✔ Y वर्ग शहरांसाठी: 16% (मागील 20% वरून कमी) ✔ Z वर्ग शहरांसाठी: 8% (मागील 10% वरून कमी) या प्रमाणे X Y Z Cities साठी HRA लागू करण्यात आला आहे. याबाबतची PDF खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर डाउनलोड करा.
X Y Z Cities For HRA PDF – Download Here
Conclusion
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५० टक्यावरून ५३ टक्के पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता (HRA Calculation Rates In Maharashtra) मिळणार आहे. तसेच, महागाई भत्त्याच्या वाढीनुसार HRA मध्ये स्वयंचलित वाढ होणार आहे. अधिक माहितीसाठी X Y Z Cities For HRA PDF पाहा.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय