ST Employee Demands Maharashtra: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, राज्यातील राज्य परिवहन महामंडळ (ST) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली. या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि विविध मागण्यांबाबत महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. विधानपरिषद सदस्यांनी ST कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने या मागण्यांवर कोणती कार्यवाही केली आहे, यावर स्पष्टीकरण दिले आहे. (Maharashtra Budget Session)
Table of Contents
तारांकित प्रश्न: ST Employee Demands Maharashtra
राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेले तारांकित प्रश्न (Legislative Assembly)
🔹 वेतन विलंब: ST कर्मचाऱ्यांना महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन मिळत नाही.
🔹 थकबाकीची देयके: महागाई भत्ता फरक, वार्षिक वेतनवाढ, घरभाडे भत्ता आणि सुधारित भत्ते अद्याप लागू नाहीत.
🔹 PF आणि ग्रॅज्युएटी थकीत रक्कम: सुमारे २१०० कोटी रुपयांची थकबाकी असून, गेल्या १० महिन्यांपासून ही रक्कम ट्रस्टमध्ये जमा करण्यात आलेली नाही.
🔹 कोविड भत्ता आणि कॅशलेस मेडिक्लेम: याबाबतही निर्णय बाकी.
🔹 स्वमालकीच्या बसेस: महामंडळाकडे पुरेशा बसेस नसून, सरकारने महामंडळाला नवी वाहने उपलब्ध करून द्यावीत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन आणि इतर प्रश्नांबाबत सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महत्त्वाचा खुलासा
सन्माननीय परिवहन मंत्री यांनी वरील प्रश्नावर खालीलप्रमाणे खुलासा केला आहे.
📌 वेतन: मा. औद्योगिक न्यायालयातील याचिकेत आदेशित केलेल्या नुसार रा.प. महामंडळाला वेतन प्रदान अधिनियम १९३६ लागू होत असल्यामुळे त्यामधील प्रावधान अन्वये दरमहा १० तारखेपर्यंत वेतन अदा करता येते असे त्यामध्ये नमूद आहे. त्यानुसार वेतन अदा करण्यात येते.
📌 थकबाकी: राज्य शासनाने गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार महागाई भत्याच्या थकबाकीबाबत महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर सदर थकबाकीबाबत महामंडळाने निर्णय घेण्याचे समितीने निर्देश दिले आहेत, तदनुसार रा.प. महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर रा. प. महामंडळ स्तरावर योग्यतो निर्णय घेण्यात येईल.
📌 नवीन बसेस: रा.प. महामंडळाने २६४० स्वमालकीची नवीन तयार बसेस महामंडळाच्या वाहन ताफ्यात जमा करण्याचे ठरविले असून मार्च २०२५ पर्यंत प्राप्त होणाऱ्या ५०० वाहनांपैकी २०४ वाहने प्राप्त झालेली असून विभागांना वाटप करण्यात आलेली आहे.
वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य
📌 PF आणि ग्रॅज्युएटी: एसटी कर्मचाऱ्यांचे / अधिकाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅज्युएटीची रक्कम, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळास व उपदान निधी विश्वस्त मंडळास रु. २२१४.४७ कोटी अदा करणे बाकी आहे. हे सरकारने मान्य केले आहे.
8 व्या वेतन आयोगाची घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
📌 बैठका व चर्चासत्रे: प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांसदर्भात बैठका घेण्यात आलेल्या आहेत. बैठकींमध्ये तत्का. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दि.०१.०४.२०२० रोजीच्या मूळ वेतनामध्ये रु.६५००/- इतकी वाढ करून वेतन निश्चिती केलेली आहे.
तसेच दि.०४.१०.२०२३ रोजीच्या गठीत करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालानुसार रा.प.म.ची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर इ. च्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत रा. प. महामंडळ स्तरावर निर्णय घेण्यात येईल.
अधिक माहितीसाठी: तारांकित प्रश्नांची यादी पाहा
निष्कर्ष
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर (ST Employee Demands Maharashtra) विधानसभेत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, महागाई भत्ता आणि पीएफचे 2100 कोटी रुपये थकीत आहेत. सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमली असून, महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यावर मागण्या पूर्ण होतील, असे सांगितले आहे.
नवीन बसेस देण्याची प्रक्रिया सुरू असून, 204 बसेस वाटप करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बैठका घेतल्या असून, 6500 रुपयांची वेतनवाढ केली आहे. महागाई भत्ता व इतर देयके आर्थिक स्थिती सुधारल्यावर दिली जातील. त्यामुळे पुढील काळात सरकार कोणती निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! फेब्रुवारी 2025 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर
आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना मोठी भेट!