Ladki Bahin Yojana Installment Date: ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हाफ्ता मिळालेला नव्हता, त्यांना आता डबल भेट मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana February March Installment Date)
Table of Contents
सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार Ladki Bahin Yojana Installment Date
‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च २०२५ महिन्यांचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.
📅 ही प्रक्रिया १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून,
💵 फेब्रुवारी महिन्याचे ₹1500 + मार्च महिन्याचे ₹1500 असे एकूण ₹3000 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.
✅ Ladki Bahin Yojana Installment Date ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, सर्व पात्र लाभार्थींना हा लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत 7 हप्त्यांचे मिळून 10,500 रुपये पात्र लाभार्थींना मिळाले आहेत. आता (Ladki Bahin Yojana 8th and 9th Installment) 8व्या आणि 9व्या हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये झाल्यावर एकूण रक्कम 13,500 रुपयांवर पोहोचेल.
लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी भेट! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘रूपे कार्ड’ लाँच
महिला दिनाचं गिफ्ट! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत दुप्पट निधी
लाडकी बहीण योजना: Ladki Bahin Yojana February March Installment Date
- ‘लाडकी बहीण योजना‘ जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे.
- आतापर्यंत 7 हप्ते जमा झाले आहेत.
- फेब्रुवारीचा हप्ता अजून मिळालेला नाही, पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana 8th and 9th Installment Date)
- ५ ते ६ मार्च या काळात हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू
- फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3000 रुपये 7 मार्चपर्यंत जमा होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे.
- निवडणुकीच्या वेळी महायुतीने लाडक्या बहिण योजनेचे 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आता यावर चर्चा चालू आहे.
लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, 2.63 लाख लाभार्थी अपात्र? पात्रता यादी पहा
महिला व बालविकास मंत्री यांची घोषणा Ladki Bahin Yojana Installment Date
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, महिला दिनानिमित्त सरकारने हा निर्णय घेतला असून, ७ मार्च २०२५ पासून सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक १२ मार्चपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी जमा केला जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातील भगिनींनी निश्चिंत राहावे!
लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार, पण ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत!
लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे चेक करायचे? How To Check Ladki Bahin Yojana Money Status
जर तुम्हाला लाडकी बहीण योजना पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी खालील सोपे पर्याय वापरू शकता: (Ladki Bahin Yojana Payment Status)
1. बँक खाते तपासा
योजना अंतर्गत मिळालेली रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे का, हे तपासण्यासाठी हे पर्याय वापरा:
✅ ATM – तुमच्या डेबिट कार्डद्वारे बॅलन्स चेक करा.
✅ बँक पासबुक अपडेट करा – जवळच्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री करून खात्यात जमा रक्कम तपासा.
✅ मेसेज/SMS – तुमच्या बँकेने दिलेल्या मिस्ड कॉल क्रमांकावर कॉल करून SMS द्वारे बॅलन्स मिळवा.
✅ नेट बँकिंग / मोबाईल बँकिंग अॅप – तुमच्या बँकेच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करून ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा.
लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर!
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर
- तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करा आणि पैसे जमा झाले आहेत का, हे तपासू शकता. (How To Check Ladki Bahin Yojana Money Status)
शासकीय मदत केंद्र
- तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील शासकीय मदत केंद्रात (अंगणवाडी, ग्रामपंचायत, नगर पालिका किंवा महानगरपालिका) येथे जाऊन लाडकी बहीण योजनेच्या पैशांची माहिती विचारू शकता.
महत्वाचे
- तुमचा बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असल्याची खात्री करा.
- तुम्ही नियमितपणे तुमचे बँक खाते तपासा.
महत्त्वाचे: सरकारच्या घोषणेनुसार ७ मार्च २०२५ पर्यंत पैसे खात्यात जमा होतील. जर तोपर्यंत पैसे आले नाहीत, तर संबंधित विभागाशी संपर्क साधा.
२१०० रुपये कधीपासून मिळणार?
महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी या योजनेच्या मदतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. एकदा हा निर्णय झाला की, महिलांना दर महिन्याला २,१०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. (Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update)
लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!
लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यवधी महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवसांत २१०० रुपयांसंदर्भात अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांचे सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
👉 तुमच्या खात्यात पैसे आले का? याबाबत तुम्ही तुमच्या बँकेत त्वरित चौकशी करा!
निष्कर्ष
Ladki Bahin Yojana February March Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चमध्ये दुप्पट रक्कम मिळणार आहे. १२ मार्चपर्यंत 3000 रुपये जमा होतील. 2100 रुपये वाढीव मदतीबाबत अधिवेशनात निर्णय अपेक्षित आहे. महिलांनी नियमितपणे बँक खाते तपासावे आणि अधिक माहितीसाठी शासकीय मदत केंद्राशी संपर्क साधावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ‘सुधारित’ शासन निर्णय सविस्तर संपूर्ण माहिती