महिला दिनाचं गिफ्ट! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत दुप्पट निधी! Majhi Ladki Bahin Yojana Womens Day 3000 Fund

By Marathi Alert

Updated on:

Majhi Ladki Bahin Yojana Womens Day 3000 Fund: महिला दिनाचे औचित्य साधून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने लाभार्थी महिलांसाठी फेब्रुवारी-मार्चचे ₹3,000 सन्मान निधी थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेतून 2.38 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना हप्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana Installment Date

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे मिळून एकूण ₹3,000 सन्मान निधी सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Ladki Bahin Yojana Feb March Installment Date)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Womens Day 3000 Fund

✅ महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून विशेष सन्मान निधी
माझी लाडकी बहिण योजना” लाभार्थींना फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे 1,500 रुपये प्रमाणे ₹3,000 थेट खात्यात जमा करण्यात येत आहे.
✅ आर्थिक सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना ही माहिती दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2.38 कोटी महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी भेट! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘रूपे कार्ड’ लाँच

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले का? येथे तपासा एका क्लिकवर

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा भत्ता मंजूर

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेमुळे महिलांना मोठा फायदा! दरमहा ₹1,500 थेट खात्यात

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू केली असून, यामुळे राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे.

या योजनेद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, आरोग्य तसेच पोषण सुधारणा आणि रोजगार व आर्थिक विकासाला चालना देणे. हे मुख्य उद्देश आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: महत्वाचे फायदे

✅ पात्र महिलांना दरमहा ₹1,500 थेट खात्यात
✅ रोजगार व आर्थिक स्वावलंबनाला चालना
✅ महिलांचे व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यात सुधारणा

लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी भेट! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘रूपे कार्ड’ लाँच

लाडकी बहीण योजना: २.३८ कोटी महिलांना लाभ! आर्थिक पाहणी अहवाल

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्र सरकारने जून, २०२४ मध्ये सुरू केली असून, डिसेंबर २०२४ पर्यंत २.३८ कोटी महिलांनी याचा लाभ घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक पाहणी अहवालात लाडकी बहीण योजनेसाठी ७ महिन्यात सरकारने ₹१७,५०५.९ कोटी खर्च झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार? पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर

Majhi Ladki Bahin ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठी आर्थिक मदत ठरत असून, भविष्यात आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!

MarathiAlert.com वर आम्ही तुम्हाला अचूक, उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि कर्मचारी अपडेट्स यांसारख्या विविध विषयांवर लेख लिहण्याचा आमचा 6 वर्षाचा अनुभव आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!