Mahatma Phule Jan Arogya Yojana: जन आरोग्य योजनेत 1356 आजारांवर विनामूल्य उपचार! तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटल लिस्ट पाहा

By Marathi Alert

Updated on:

Mahatma Phule Jan Arogya Yojana: राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, आता नागरिकांना आरोग्य संरक्षण 5 लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, आता दिनांक 14 जून रोजीच्या शासन परिपत्रकान्वये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत जवळपास 1356 आजारावर उपचार घेता येणार असून, राज्यातील हॉस्पीटल जिल्हानिहाय यादी आणि आजार यादी खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून, या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 1.5 लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय दिनांक 28 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

‘महिलांना’ महिन्याला 1500 रुपये’ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना -संपूर्ण माहिती

पांढऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. 26 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma Phule Jan Arogya Yojana) व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat Jan Arogya Yojana) या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक (White Ration Card) कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

White Ration Card: शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे.

राज्यातील 10 हजार महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा; सविस्तर तपशील जाणून घ्या..

त्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करण्याबाबत संबंधित जिल्ह्यांना सूचना दिल्या आहे. त्यामुळे आता शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देखील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जन आरोग्य योजनेअंतर्गत 1356 आजारांवर करता येणार उपचार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या 1 हजार एवढी आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Disease List

महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 30 निवडक विशेष सेवांतर्गत 971 प्रकारचे गंभीर व अधिक खर्चिक उपचार व 121 शस्त्रक्रिया पश्चात MJPJAY Disease List आजारांवर उपचार व (follow-up) समावेश असून लाभार्थी रुग्णांना अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयामधून रोख रक्कमरहित (कॅशलेस) या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात. [महात्मा फुले जन आरोग्य योजना 1356 आजारांची यादी येथे पहा]

Mjpjay Helpline Number (टोल-फ्री क्रमांक) : १५५ ३८८ , १८०० २३३ २२ ००

MJPJAY योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हानिहाय हॉस्पिटल यादी | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जवळपास विविध आजारांवर असे एकूण 996 आजारांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालये समाविष्ट असून जिल्हानिहाय दवाखाण्याची यादी खालील प्रमाणे पहा.

  1. MJPJAY Hospital List पाहण्यासाठी सर्वप्रथम www.jeevandayee.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
  2. होम पेज वर गेल्यानंतर अंगीकृत रुग्णालय या पर्यायावर क्लिक करा
  3. आता त्यामधून तुम्ही जिल्हानिहाय किंवा आजारानुसार एक पर्याय निवडा
  4. त्यानंतर तुमचा जिल्हा निवड करून हॉस्पिटल ची यादी पहा
  5. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List

0 thoughts on “Mahatma Phule Jan Arogya Yojana: जन आरोग्य योजनेत 1356 आजारांवर विनामूल्य उपचार! तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटल लिस्ट पाहा”

  1. शासनाचा चागंला निर्णय, महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद

    Reply

Leave a Comment