Anganwadi Sevika Aug Salary अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचे वेतन मंजूर

Published On: August 22, 2025
Follow Us
Anganwadi Sevika Aug Salary

Anganwadi Sevika Aug Salary राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने २९३.८०९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

तसेच यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट, २०२५ पासून सुरू होत असल्यामुळे, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन आणि पेन्शन १ सप्टेंबर, २०२५ ऐवजी २६ ऑगस्ट, २०२५ रोजी अदा करण्याचे निर्देश दिले आहे.

हा निधी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ६०% हिस्सा, राज्याचा ४०% हिस्सा आणि राज्याचा अतिरिक्त १००% हिस्सा यांचा समावेश आहे.

  • एकूण निधी: २९३.८०९५ कोटी रुपये
  • केंद्र सरकारचा हिस्सा (६०%): ६९.०५३७ कोटी रुपये
  • राज्य सरकारचा हिस्सा (४०%): ४६.०३५८ कोटी रुपये
  • अतिरिक्त राज्य सरकारचा हिस्सा (१००%): १७८.७२ कोटी रुपये

हा निधी वितरीत करण्यासाठी नियोजन विभाग आणि वित्त विभागाने सहमती दिली होती. या शासन निर्णयानुसार, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना हा निधी तातडीने SNA (Single Nodal Agency) खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

aasha gatparvartak meeting 2026

राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

August 12, 2026
anganwadi sevika salary july 2026

अंगणवाडी सेविका व मदतनीस जुलै 2026 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

July 28, 2026
aarogya vibhag aadhava

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक; आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक संपन्न

July 25, 2026
asha-workers-online-data-entry-clarification

आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन कामाबाबत विधानसभेत महत्वाचे स्पष्टीकरण

July 8, 2026
anganwadi-sevika-promotion-age-limit-gr

अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय! मुख्यसेविका पदोन्नतीसाठी वयोमर्यादेत बदल; नवीन शासन निर्णय जारी

July 3, 2026
panvel-viral-video-truth-anganwadi-sevika

त्या व्हायरल व्हिडिओ मधील अंगणवाडी सेविकांबाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा खुलासा

June 27, 2026

Leave a Comment