Mahajyoti Tab Yojana Registration Extended महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर द्वारे राबवण्यात येत असलेल्या JEE/NEET/MHT-CET 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
Mahajyoti Tab Yojana Registration Extended
JEE/NEET/MHT-CET 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख यापूर्वी २० जून २०२५ होती. परंतु, अकरावी विज्ञान शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती महाज्योती संस्थेकडे केली होती. विद्यार्थ्यांची ही विनंती विचारात घेऊन महाज्योती संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत JEE, NEET आणि MHT-CET या परीक्षांसाठी १८ महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि दररोज ६ जीबी इंटरनेट सेवा देखील पुरवली जाणार आहे.
अकरावी विज्ञान शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार आता ही मुदत वाढवून २० जुलै २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना आता २० जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांना त्यांच्या अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्त्या (उदा. वैध नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे) करण्यासाठी देखील २० जुलै २०२५ पर्यंत वेळ मिळेल.
या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तयारी करावी, असे आवाहन महाज्योती संस्थेने केले आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
या मुदतवाढीमुळे, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना आता २० जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांना त्यांच्या अर्जांमध्ये दुरुस्ती (उदा. वैध नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे) करण्यासाठी देखील २० जुलै २०२५ पर्यंत वेळ मिळेल.
महाज्योती संस्थेने १६ जून २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थी महाज्योतीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट : https://mahajyoti.org.in/
ऑनलाईन अर्ज : येथे करा
