Margin Money Scheme केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया (Stand Up India) योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक खास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेनुसार, नवउद्योजकांना त्यांच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पैशांपैकी काही भाग ‘मार्जिन मनी’ म्हणून दिला जाणार आहे.
Margin Money Scheme
Margin Money Scheme या योजनेचा उद्देश हा आहे की, अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील उद्योजकांना आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम बनवणे आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?
- आर्थिक मदत: तुमच्या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी तुमच्या वाट्याला येणाऱ्या २५% रकमेपैकी, तुम्हाला १५% पर्यंतची रक्कम ‘मार्जिन मनी’ म्हणून दिली जाईल. यामुळे तुमचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.
- पात्रता: अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- योजनेची अंमलबजावणी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
विशेष आवाहन: मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
अर्ज कुठे कराल?
तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर खालील पत्त्यावर अर्ज सादर करू शकता:
सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१.
अधिक माहितीसाठी तुम्ही ०२२-२५२२२०२३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा acswomumbaisub@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता.
तुम्ही पात्र असाल तर या संधीचा नक्की फायदा घ्या आणि तुमच्या उद्योगाला एक नवी दिशा द्या!