Maharashtra Rain Alert भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Rain Alert
प्रमुख ठळक बाबी:
- कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
- कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना १६ ते २० ऑगस्टदरम्यान समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी सूचना:
- आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाचे फोन क्रमांक: ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९ आणि मोबाईल क्रमांक ९३२१५८७१४३ उपलब्ध आहेत.
- सचेत ॲपद्वारे नागरिकांना सतत धोक्याचे संदेश पाठवले जात आहेत.
- रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलीका नदीने, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी सतर्क राहावे.
- राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (NDRF/SDRF) आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत.
नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी: https://mausam.imd.gov.in/mumbai/