उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याकरिता या तारखेपर्यंत मुदतवाढ HSRP Number Plate Registration Deadline

Published On: May 16, 2026
Follow Us
HSRP Number Plate Registration Deadline

HSRP Number Plate Registration Deadline राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवण्यासाठी फक्त काही दिवसच शिल्लक आहे, यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर जर HSRP नंबर प्लेट नसेल तर १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

HSRP Number Plate Registration Deadline

HSRP पाटी का आहे महत्त्वाची?

  • HSRP पाटी ही वाहनांची सुरक्षा आणि ओळख पटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
  • या पाटीवर एक खास कोड आणि सुरक्षा चिन्हे असतात, ज्यामुळे वाहनांची चोरी झाल्यास ती शोधणे सोपे होते.
  • त्याचबरोबर या पाटीमुळे बनावट नंबर प्लेट तयार करणे शक्य होत नाही.

पाटी कशी बसवावी?

  • ज्या वाहनधारकांना अद्याप ही पाटी बसवायची आहे, त्यांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ३० जून २०२६ पर्यंत नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे.

मुदत संपल्यानंतर काय होणार?

  • ज्या वाहनधारकांनी ३० जून २०२६ पर्यंत HSRP पाटी बसवली नाही तर १ हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

या संदर्भात, सह परिवहन विभागाने सर्व वाहन मालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या अंतिम मुदतीचा लाभ घेऊन आपल्या वाहनांवर लवकरात लवकर HSRP पाटी बसवून घ्यावी.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment