Anganwadi Sevika July Salary महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनासाठी आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी जुलै २०२५ महिन्याकरिता एकूण २५३.३१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या आयुक्तांना हा निधी वितरित केला जाईल.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र सरकारकडून वेळेवर निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमितपणे मिळावे यासाठी २ जून २०१७ रोजी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त नसले तरी मानधनाची अर्थसंकल्पित रक्कम खर्च करण्यास विभागाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या शासन निर्णयान्वये, जुलै २०२५ महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी सध्याच्या तरतुदीतून २५३.३१ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये केंद्र हिस्सा (६०%) म्हणून ४४.७५ कोटी रुपये, राज्य हिस्सा (४०%) म्हणून २९.८४ कोटी रुपये आणि अतिरिक्त राज्य हिस्सा (१००%) म्हणून १७८.७२ कोटी रुपये यांचा समावेश आहे.
आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांना हा निधी योग्य पद्धतीने खर्च करण्याची आणि केंद्र शासनाकडून केंद्राचा हिस्सा मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची सूचना देण्यात आली आहे. हा शासन निर्णय नियोजन विभाग आणि वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा