अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी सानुग्रह अनुदान मंजूर

By MarathiAlert Team

Published on:

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये (ICDS) कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार दोन अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी रु. १० लाख याप्रमाणे एकूण रु. २० लाख इतका निधी सानुग्रह अनुदान म्हणून वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा आदेश महिला व बाल विकास विभागाने दिनांक २४ सप्टेंबर, २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 

मंत्रिमंडळाच्या २३ जुलै, २०२४ रोजीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार , या अनुदानाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.

सानुग्रह अनुदानाची रक्कम आणि लागू करण्याची तारीख

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी खालीलप्रमाणे सानुग्रह अनुदान लागू करण्यात आले आहे.

  • अपघाती मृत्यू झाल्यास: रुपये १० लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान.
  • कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास: रुपये ५ लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान.

सदर निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक १ एप्रिल, २०२४ पासून लागू राहील. या निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार मिळला आहे.

निधीची तरतूद व कार्यपद्धती

या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष कार्यान्वित करण्यात येईल. त्यामध्ये दरवर्षी आवश्यक ती तरतूद विहित पध्दतीने अर्थसंकल्पित केली जाईल. या लेखाशीर्षांतर्गत उपलब्ध होणाऱ्या तरतुदीमधून सानुग्रह अनुदानाचा खर्च भागविण्यात येत आहे.

दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान मंजूर

अंगणवाडी सेविका (जि. अहिल्यानगर) आणि अंगणवाडी सेविका (जि. बीड) यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी रु. १० लाख याप्रमाणे एकूण रु. २० लाख इतका निधी सानुग्रह अनुदान म्हणून वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा

सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!