“महाराष्ट्र लवकरच भारताच्या AI क्रांतीचे केंद्र बनणार! मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा” Artificial intelligence

By MarathiAlert Team

Updated on:

Artificial intelligence : महाराष्ट्र राज्य प्रशासन आणि अर्थव्यवस्थेच्या गतीसाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करत असून, महाराष्ट्र लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AI आणि डिजिटल सेवांची प्रगती Artificial intelligence

AI Full Form Artificial intelligence

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट २०२५ मध्ये सांगितले की, राज्यात डिजिटल सेवांचे प्रमाण वाढले असून बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठात एआय सेंटर स्थापन करण्यात आले असून, जागतिक आर्थिक मंचाच्या सहकार्याने इंडस्ट्री सेंटर सुरू करण्यात आले आहे.

MHT CET 2025 : प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी!

१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा रोडमॅप

महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यासाठी नीती आयोगाच्या सहकार्याने नवीन आर्थिक रोडमॅप तयार केला जात आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्राला (MMRDA) १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचे नियोजन सुरू आहे.

जुनी पेन्शन योजनेसाठी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

डेटा सेंटर आणि फिनटेकमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

देशातील ६०% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत.
✅ नवीन मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारले जात आहे.
२०३० पर्यंत ५०% वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल.
मुंबई ही भारताची ‘फिनटेक राजधानी’ बनेल.

नाशिक कुंभमेळ्यासाठी स्मार्ट व्यवस्थापन

२०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्यासाठी AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
✅ गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि आभासी अनुभवासाठी स्मार्ट उपाययोजना केल्या जातील.

कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती

‘अ‍ॅग्री-स्टॅट’ उपक्रमाअंतर्गत शेती प्रक्रियेचे पूर्ण डिजिटायझेशन होत आहे.
‘ड्रोन शक्ती’ कार्यक्रमांतर्गत कृषी फवारणीसाठी ड्रोन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल.

MHT CET 2025 : प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिसरी मुंबई

✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘इनोव्हेशन सिटी’ विकसित केली जाणार आहे.
३०० एकरमध्ये तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन आणि AI वर आधारित शहर विकसित होणार आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथे ग्लोबल कॅप्टिव्ह सेंटर्स (GCC) पार्क्स स्थापन केले जातील.

📢 महाराष्ट्राचा एआय (Artificial intelligence) आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पुढाकार, भारताच्या डिजिटल भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे! 🚀

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!