सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो आशा स्वयंसेविका (ASHA Workers) आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, आता नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतचा पगरासाठीचा निधी मंजूर केला आहे.
याबाबतचा शासन निर्णय १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केला आहे. या निर्णयानुसार, त्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यांच्या कालावधीचे मानधन (incentive/honorarium) वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
आशा वर्कर सॅलरी मानधन वितरणाचा तपशील | Asha Worker Salary
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेतून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना मोबदला (incentive/honorarium) दिला जातो.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण रु. ९६५७४.२५ लाख इतकी तरतूद अर्थसंकल्पीय आणि पुरवणी मागणीतून मंजूर करण्यात आली आहे.
यापूर्वी, ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे मानधन रु. ५४६८४.१५ लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
याच अनुषंगाने, नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील asha worker salary दरमहा १५ तारखेला मासिक तत्वावर अदा केली जाईल.
मानधन वितरणाचे वेळापत्रक आणि निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
हे ही वाचा: या आशा सेविकेचा राज्यात 1 ला नंबर; MAATR App वरील कामगिरीने वेधले राज्याचे लक्ष

या निर्णयामुळे आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कार्याचा योग्य मोबदला वेळेवर मिळणार आहे. या asha worker salary वितरणाची आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात आशा स्वयंसेविकांचे योगदान
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाची आणि इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा मोठा वाटा आहे.
केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या सेवांसाठी त्यांना प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा विचार करून, या मानधनाचे वेळेवर वितरण होणे अत्यंत आवश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार, नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील asha worker salary चा निधी दरमहा १५ तारखेला अर्थसंकल्पीय अंदाज, वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर वितरीत करण्याची कार्यवाही कार्यासन अर्थसंकल्प व लेखा, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना करावी लागणार आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना नोव्हेंबर, 2025 ते मार्च, 2026 या कालावधीचे मानधन वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पाहा
















