CET CELL CAP NOTICE महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांनी CAP (Centralized Admission Process) साठी ऑनलाईन नोंदणी अर्ज सादर केले आहेत, त्यांच्यासाठी ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे.
CET CELL CAP NOTICE
अर्ज पडताळणी आणि गुणवत्ता यादी:
CET सेलने कळवले आहे की, ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज सादर केले आहेत, त्यांनी दिलेल्या वेळेत आपली अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. यानंतर संबंधित अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) अधिकृत संकेतस्थळावर (http://www.mahacet.org) प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी या तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील आपली माहिती काळजीपूर्वक तपासावी आणि ती बरोबर असल्याची खात्री करावी.
हरकती आणि दुरुस्ती प्रक्रिया:
जर उमेदवारांना तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये काही त्रुटी आढळल्यास, तक्रार निवारणासाठी ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
- ई-स्क्रुटीनी (E-Scrutiny) पर्याय निवडलेल्या उमेदवारांसाठी: ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पडताळणीचा (E-Scrutiny Center) पर्याय निवडला आहे, त्यांना तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये काही आक्षेप असल्यास, त्यांनी उमेदवाराच्या लॉगिनद्वारे तक्रार (Grievance) नोंदवावी. अशा उमेदवारांचा अर्ज दुरुस्तीसाठी त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध (Unlock) करून दिला जाईल. उमेदवाराने कोणत्याही दुरुस्ती/सवलतीसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सुधारित (Edit) करून पुन्हा सादर (Submit) करावा.
- उदाहरणार्थ: जर एखाद्या SEBC प्रवर्गातील उमेदवाराने सुरुवातीला जात प्रमाणपत्र नसताना खुल्या प्रवर्गातून अर्ज केला होता आणि तक्रार निवारण कालावधीमध्ये त्याला जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर (NCL) प्रमाणपत्र मिळाले असेल, तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती देखील मिळाली असेल, तर तो उमेदवार संबंधित प्रवर्गातून अर्ज करू शकतो.
- प्रत्यक्ष पडताळणी (Scrutiny Center) पर्याय निवडलेल्या उमेदवारांसाठी: ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज पडताळणीचा (Scrutiny Center) पर्याय निवडला आहे, त्यांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील त्रुटींचे निराकरण करण्यासाठी मूळ प्रमाणपत्रांसह प्रत्यक्ष पडताळणी केंद्रावर जावे.
अंतिम गुणवत्ता यादी:
उमेदवारांनी नोंदवलेल्या वैध हरकती, दावे आणि त्रुटी यांची दखल अंतिम गुणवत्ता यादीमध्ये (Final Merit List) घेतली जाईल. CET सेलने स्पष्ट केले आहे की, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही हरकतींची नोंद घेतली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपल्या हरकती नोंदवून आवश्यक दुरुस्त्या करून घेणे बंधनकारक आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी, उमेदवार CET सेलच्या अधिकृत वेबसाईट http://www.mahacet.org ला भेट देऊ शकतात किंवा ०२२-२२०१६१५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ईमेलसाठी cetcell@mahacet.org हा पत्ता वापरता येईल.
