केंद्रप्रमुख भरती परीक्षा महत्त्वाची अपडेट: अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका स्वरूप आणि शेवटच्या क्षणी रिव्हिजन टिप्स

Published On: January 30, 2026
Follow Us
Kendrapramukh Syllabus 2026

Kendrapramukh Syllabus 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (mscepune) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिलेल्या माहितीनुसार, केंद्रप्रमुख परीक्षा आता ३ फेब्रुवारी आणि ४ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे. केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका स्वरूप आणि शेवटच्या क्षणी रिव्हिजन टिप्स बद्दल सविस्तर लेटेस्ट अपडेट पाहूया.

केंद्रप्रमुख परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा नियोजित दिवशीच होणार

निवडणूक असलेल्या १२ जिल्ह्यांसाठी विशेष निर्णय: राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नियोजित आहेत. या निवडणुकांमध्ये शिक्षकांवर निवडणूक कर्तव्याची (Election Duty) जबाबदारी असणार आहे.

त्यामुळे, या १२ जिल्ह्यांमधील केंद्रप्रमुख परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा ३ फेब्रुवारी २०२६ रोजीच घेतली जाईल.

कारण: शिक्षकांना ४ फेब्रुवारी रोजी निवडणूक कर्तव्यासाठी हजर राहावे लागते. त्यांची ही गैरसोय होऊ नये म्हणून ५ फेब्रुवारीला मतदान असलेल्या जिल्ह्यांतील शिक्षकांची परीक्षा ३ तारखेलाच संपवली जाईल, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

इतर जिल्ह्यांमधील उमेदवारांची परीक्षा नियोजनानुसार ३ आणि ४ फेब्रुवारीला होईल.

हॉल तिकीट (Admit Card): उमेदवारांचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

केंद्रप्रमुख भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक

केंद्रप्रमुख भरती परीक्षा अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका स्वरूप | Kendrapramukh Syllabus 2026

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी बहुप्रतिक्षीत ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा’ आता जवळ आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Kendrapramukh Syllabus 2026) आणि परीक्षेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. ही परीक्षा २०० गुणांची असून ती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. कमी वेळात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी नेमका अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सुरुवातीला परीक्षेच्या तांत्रिक बाबी समजून घेऊया. ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.

  • एकूण गुण: २०० गुण
  • एकूण प्रश्न: २०० प्रश्न 
  • माध्यम: मराठी आणि इंग्रजी (भाषिक प्रश्नांनुसार)
  • कालावधी: परीक्षेचे स्वरूप पाहता वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

सविस्तर अभ्यासक्रम आणि गुणविभागणी

Kendrapramukh question paper Syllabus 2026

या परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन प्रमुख विभागांमध्ये विभागली आहे. दोन्ही विभागांना समान भारांश (Weightage) आहे.

विभाग १: बुद्धिमत्ता व अभियोग्यता (१०० गुण)

हा विभाग उमेदवाराची तार्किक विचारक्षमता आणि शिक्षकी पेशाला आवश्यक गुण तपासण्यासाठी आहे.

१. अभियोग्यता (Aptitude): यामध्ये तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (मराठी व इंग्रजी), अवकाशीय क्षमता, कल, आवड आणि शिक्षक म्हणून तुमचे व्यक्तिमत्व व समायोजन क्षमता तपासली जाईल.

२. बुद्धिमत्ता (Intelligence): आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मांडणी यांसारख्या घटकांवर प्रश्न असतील.

विभाग २: शालेय शिक्षणातील नियम व अभ्यासक्रम (१०० गुण)

हा विभाग पूर्णपणे तुमच्या क्षेत्राशी निगडित (Domain Knowledge) आहे. यामध्ये खालील ६ उपघटकांचा समावेश आहे:

१. भारतीय राज्यघटना व शिक्षण (१० गुण): शिक्षणाविषयक घटनात्मक तरतुदी, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (RTE), बाल हक्क संरक्षण कायदा २००५, आणि केंद्र व राज्य शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजना. 

२. शिक्षण क्षेत्रातील संस्था (१० गुण): UNICEF, NCERT, SCERT, NUEPA, DIET, आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या इतर प्रमुख संस्था व त्यांची कार्ये. 

३. माहिती तंत्रज्ञान – IT (१५ गुण): इंटरनेटचा वापर, शाळास्तरावरील माहिती भरणे (SARAL, U-DISE+), संगणक वापर आणि शाळास्तरावरील हिशोब व अंदाजपत्रक. 

४. अभ्यासक्रम व मूल्यमापन (१५ गुण): पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतचा अभ्यासक्रम, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, ASER/NAS/PISA सारख्या चाचण्या, आणि अध्ययन निष्पत्तीतील उणिवा. 

५. माहितीचे विश्लेषण व संप्रेषण (२० गुण): प्राप्त माहितीचे आणि विविध पोर्टलवरील डेटाचे विश्लेषण करणे, संप्रेषण कौशल्य आणि समाज संपर्क साधने. 

६. विषयनिहाय आशयज्ञान (३० गुण):  विशेष भर: इंग्रजी विषयाचे ज्ञान आणि सामान्यज्ञान.  मराठी, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास यांचे माध्यमिक स्तरापर्यंतचे ज्ञान. शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडी.

(Kendrapramukh Syllabus 2026) क्रॅक करण्यासाठी ‘लास्ट मिनिट’ रिव्हिजन टिप्स

परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना नवीन वाचण्यापेक्षा रिव्हिजनवर भर देणे फायदेशीर ठरते.

१. शासकीय जीआर (GR) आणि कायदे: RTE २००९ आणि बाल हक्क संरक्षण कायद्यातील महत्त्वाची कलमे तोंडपाठ करा. अद्ययावत शासन निर्णय (GR) आणि योजनांची माहिती अचूक ठेवा. 

२. फुल फॉर्म्स आणि संस्था: शिक्षण क्षेत्रातील सर्व संस्थांचे (उदा. NUEPA, CCRT, TISS) पूर्ण रूप (Full Forms) आणि त्यांची मुख्य कार्यालये कुठे आहेत, याची उजळणी करा. 

३. संगणक आणि पोर्टल्स: SARAL आणि U-DISE+ प्रणालीमध्ये डेटा कसा भरला जातो, त्यातील तांत्रिक संज्ञा एकदा नजरेखालून घाला. 

४. बुद्धिमत्तेचा सराव: बुद्धिमत्ता चाचणीत ‘वेळ’ हाच महत्त्वाचा घटक आहे. कूटप्रश्न आणि तर्क व अनुमान यावरील प्रश्न सोडवण्याचा वेग वाढवा. 

५. इंग्रजीकडे दुर्लक्ष नको: अभ्यासक्रमात इंग्रजी विषयाच्या ज्ञानावर विशेष उल्लेख केला आहे. त्यामुळे व्याकरणाचे नियम आणि शब्दसंपत्ती (Vocabulary) यांची उजळणी करा.

ही परीक्षा केवळ तुमच्या ज्ञानाची नाही, तर तुमच्या अनुभवाची आणि निर्णयक्षमतेची परीक्षा आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय दिल्यास तुमचे यश निश्चित आहे.

अधिक माहितीसाठी : केंद्रप्रमुख परीक्षा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका स्वरूप अधिकृत PDF डाउनलोड करा

लेटेस्ट अपडेट: केंद्रप्रमुख परीक्षा 2026 संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नवीन आदेश जारी

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment