Ladki Bahin Yojana eKYC राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojana eKYC दुरुस्तीसाठी एकच संधी!
या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या Ladki Bahin Yojana eKYC Online प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शेवटची आणि ‘एकच’ संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे.
योजनेतील बहुतांश महिला लाभार्थी या दुर्गम आणि ग्रामीण भागातून येतात. Ladki Bahin Yojana eKYC Online प्रक्रिया पूर्ण करताना त्यांच्याकडून काही किरकोळ चुका होणे स्वाभाविक आहे.
या चुकांमुळे अनेक भगिनींना योजनेच्या लाभापासून दूर राहावे लागत असल्याची अनेक निवेदने विभागाकडे प्राप्त झाली होती.
महिला सक्षमीकरणाच्या मूळ हेतूला महत्त्व देत, या महिलांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधी देणे अत्यंत आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
Ladki Bahin Yojana eKYC Online मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची ही अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध असेल.
मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत
महिला व बालविकास विभागाने योजनेच्या लाभार्थ्यांना कळविले आहे की, त्यांच्या Ladki Bahin Yojana eKYC Online फॉर्ममध्ये जी काही माहिती चुकीची भरली गेली असेल, ती आता एका विशिष्ट मुदतीत दुरुस्त करता येईल.
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही दुरुस्ती करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध असेल. यानंतर दुरुस्तीसाठी कोणतीही संधी दिली जाणार नाही.
पती किंवा वडील हयात नसलेल्या बहिणींसाठीही सुविधा
यासोबतच, ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा भगिनींनाही Ladki Bahin Yojana eKYC Online प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अशा विशेष परिस्थितीत असलेल्या महिलांनाही योजनेचा लाभ घेणे सुलभ झाले आहे.
महिला व बालविकास विभाग अधिकाधिक लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता, लवकरात लवकर त्यांच्या e-KYC मधील त्रुटींची दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी : लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलांना e-KYC मधून सूट; शिफारस नमूना पत्र डाउनलोड करा



