Ladki Bahin Yojana June Hapta मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे! जून महिन्याचा सन्मान निधी त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया दिनांक ४ जुलै पासून सुरू झाली आहे. ५ जुलै हा निधी थेट आधार-लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल.
Ladki Bahin या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांना मोठा आधार मिळतो. महायुती सरकारचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि राज्यातील सर्व भगिनींच्या विश्वासाच्या बळावर ही योजना यशस्वीपणे सुरू आहे.
या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो भगिनींचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे आणि यापुढेही ही योजना अशीच दमदार वाटचाल करत राहील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.