महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महिलांसाठी सुरू केलेली महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत DBT द्वारे थेट बँक खात्यात दिली जाते. या लेखात आपण लाडकी बहीण योजना पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, e-KYC कशी करावी, e-KYC शिफारस पत्र, ऑनलाईन किंवा ऑफलाईन यादी कोठे चेक करायची?, बिनव्याजी कर्ज योजना, हेल्पलाईन नंबर याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे? | Ladki Bahin Yojana Maharashtra
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ही महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत DBT (Direct Benefit Transfer) द्वारे त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि त्यांचे सामाजिक पुनर्वसन व्हावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू केलेल्या या Ladki Bahin योजनेचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहे.
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
- त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
लाडकी बहीण योजनेचे स्वरूप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम DBT system द्वारे थेट लाभार्थी महिलेच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होते.
लाडकी बहीण योजना पात्रता (Eligibility)
Ladki Bahin Yojana eligibility criteria खालीलप्रमाणे आहेत.
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी
- वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता किंवा निराधार महिला पात्र आहेत
- कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला देखील अर्ज करू शकते
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक
हे ही वाचा: लाडकी बहीण योजना: पात्रता आणि अपात्रतेचे सुधारित निकष चेक करा
लाडकी बहीण योजना अपात्रता (Ineligibility)
खालील परिस्थितीत महिलांना Ladki Bahin Scheme benefit मिळणार नाही.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त असल्यास
- कुटुंबातील सदस्य income taxpayer असल्यास
- कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक असल्यास
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी MP / MLA असल्यास
- कुटुंबाकडे four wheeler vehicle असल्यास (ट्रॅक्टर वगळून)
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Ladki Bahin Yojana documents required खालीलप्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र (गरज असल्यास)
- बँक खाते तपशील (Aadhaar linked bank account)
- लाभार्थी महिलेचा फोटो व हमीपत्र
जर महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर पतीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरले जाईल.
हे ही वाचा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुधारित पात्रता निकष – शासन निर्णय
लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया (Apply Process)
Ladki Bahin Yojana apply online / offline दोन्ही पद्धतीने करता येते.
ऑनलाइन अर्ज करता न आल्यास खालील ठिकाणी अर्ज करता येतो.
- अंगणवाडी सेविका
- ग्रामसेवक
- सेतू सुविधा केंद्र
- आपले सरकार सेवा केंद्र
- आशा सेविका
- नगरपालिकेतील मदत केंद्र
महत्त्वाचे म्हणजे या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल उपलब्ध आहे.
Official Website: https://ladakibahin.maharashtra.gov.in/
या पोर्टलवर Ladki Bahin Yojana apply online, application status, eKYC update यासारख्या सेवा उपलब्ध आहेत.
लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रिया काय आहे?
Ladki Bahin Yojana e-KYC process ही लाभार्थी महिलांची ओळख पडताळण्यासाठी करण्यात येते. या प्रक्रियेत Aadhaar authentication करून लाभार्थीची माहिती सत्यापित केली जाते. शासनाने e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
लाडकी बहीण योजना e-KYC कशी करावी? How to complete Ladki Bahin Yojana eKYC

- अधिकृत पोर्टलवर लॉगिन करणे
- आधार क्रमांक टाकणे
- OTP verification करणे
- माहिती पडताळणी करून e-KYC पूर्ण करणे
जर e-KYC करताना चुकीची माहिती निवडली असेल तर शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत correction option उपलब्ध करून दिला आहे.
ई केवायसी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
लाडकी बहीण योजना e-KYC सूट शिफारस पत्र
काही महिलांना e-KYC करताना अडचण येते. उदाहरणार्थ: पतीचे निधन झाले असल्यास, वडील हयात नसल्यास, घटस्फोट झालेला असल्यास अशा महिलांना Ladki Bahin Yojana eKYC Shifaras Patra द्वारे सूट मिळते.

या महिलांनी शिफारस पत्र सोबत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र, न्यायालयाचे आदेश हे कागदपत्र संबंधित Anganwadi Sevika यांच्याकडे जमा करावे.
लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळतात?
या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1500 DBT payment थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातो. यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत नियमित मिळते.
लाडकी बहीण योजना ऑनलाईन, ऑफलाईन यादी कोठे चेक करावी?
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी (Ladki Bahin Yojana Beneficiary List) महिलांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने तपासता येते. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांचे नाव मंजूर झाले आहे का हे पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृत पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
महिलांनी अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/
वर जाऊन Ladki Bahin Yojana Beneficiary List किंवा अर्ज स्थिती (Application Status) तपासू शकतात.
वेबसाइटवर जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तसेच आधार क्रमांक किंवा नाव टाकून लाभार्थी यादी सहज पाहता येते. यामध्ये अर्ज मंजूर (Approved), प्रलंबित (Pending) किंवा नाकारलेला (Rejected) आहे का याची माहिती देखील दिसते.
याशिवाय मोबाईलवरूनही Ladki Bahin Yojana list check online करता येते. यासाठी महिलांनी Nari Shakti Doot App डाउनलोड करून मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे. त्यानंतर अर्जदारांची यादी किंवा Beneficiary List या पर्यायावर जाऊन जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यास यादीमध्ये स्वतःचे नाव तपासता येते. त्यामुळे महिलांना घरी बसून मोबाईलवरूनच आपल्या अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा मिळते.
ज्या महिलांना ऑनलाईन यादी पाहता येत नाही, त्या ऑफलाईन पद्धतीने देखील Ladki Bahin Yojana Beneficiary List तपासू शकतात. यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नगरपालिका वार्ड कार्यालय येथे जाऊन अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक देऊन माहिती मिळवता येते.
संबंधित अधिकारी लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का याची तपासणी करून माहिती देतात. त्यामुळे इंटरनेट सुविधा नसलेल्या महिलांनाही या योजनेची स्थिती तपासणे सोपे झाले आहे.
हे ही वाचा: माझी लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन यादी चेक करण्यासाठी सविस्तर माहिती वाचा
लाडकी बहीण योजना हेल्पलाईन नंबर
e-KYC किंवा अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास महिलांसाठी Ladki Bahin Yojana Helpline Number 181 सुरू करण्यात आला आहे.
या हेल्पलाई नंबरवर eKYC error, पैसे अडकणे, अर्ज स्टेटस, तांत्रिक इ. प्रकारच्या समस्या सोडवल्या जातात.
लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज
राज्य सरकार महिलांना self employment साठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी महिलांना ₹10,000 ते ₹1,00,000 पर्यंत interest free loan मिळणार आहे. ५ ते १० महिलांनी एकत्र येऊन Self Help Group (SHG) तयार करून व्यवसाय सुरू करू शकतात.
हे ही वाचा: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी बिनव्याजी कर्ज योजना काय आहे? वाचा
लाडकी बहीण योजना ‘लखपती दीदी’ संकल्पना
या योजनेद्वारे राज्य सरकारचा उद्देश एक कोटी महिलांना “Lakhpati Didi” बनवणे हा आहे.
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग, घरगुती व्यवसाय, कृषीपूरक उद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी ही संकल्पना राबवली जात आहे.
लाडकी बहीण योजना संबंधित महत्त्वाचे शासन निर्णय, परिपत्रक PDF डाउनलोड करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन निर्णय डाउनलोड करा तसेच इतर महत्वाचे शासन निर्णय परिपत्रके https://ladakibahin.maharashtra.gov.in/scheme_information या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करा.
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्र शासनाची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे महिलांना दैनंदिन खर्च भागवण्यास तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात मदत होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी eligibility, required documents, Online apply process, e-KYC , list, Loan याबाबतची माहिती सविस्तर पणे समजून घेतली आहे. तसेच अर्ज केल्यानंतर लाभार्थी यादी (Beneficiary List) तपासणे आणि वेळेत e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. शासनाने महिलांसाठी हेल्पलाईन नंबर तसेच बचत गटांच्या माध्यमातून interest free loan सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
एकंदरीत लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे पाऊल ठरत आहे. पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण करण्याची ही उत्तम संधी आहे.
