सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य; BMC शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

Published On: March 8, 2026
Follow Us
TET Exam Supreme Court Decision

TET परीक्षेबाबत शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) Civil Appeal No. 1385/2025 प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार काही शिक्षकांना ठराविक कालावधीत TET परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक करण्यात आले आहे. या निर्णयानुसार Brihanmumbai Municipal Corporation शिक्षण विभागानेही खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी सेवासातत्य आणि मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी TET अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

TET परीक्षेबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय काय आहे?

Supreme Court TET Exam Decision

TET Exam Supreme Court Decision: मा. सर्वोच्च न्यायालयाने TET परीक्षा संदर्भात Civil Appeal No. 1385/2025 (Anjuman-E-Ismat-E-Taleem Trust vs State of Maharashtra) या प्रकरणात 1 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला.

या निर्णयानुसार RTE कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीला 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, अशा सेवेत असलेल्या शिक्षकांना 2 वर्षांच्या आत TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, दिलेल्या कालावधीत जर संबंधित शिक्षक TET परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांना सेवा सुरू ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित शिक्षकांना सेवेतून निवृत्त व्हावे लागू शकते किंवा त्यांना अनिवार्य निवृत्ती देण्यात येऊ शकते.

तथापि, अशा शिक्षकांनी नियमांनुसार आवश्यक सेवा कालावधी पूर्ण केला असल्यास त्यांना पेन्शन किंवा इतर अंतिम सेवा लाभ (Terminal Benefits) मिळू शकतात. जर एखाद्या शिक्षकाची पात्र सेवा पूर्ण नसेल तर त्यांनी शासनाकडे प्रतिनिधित्व करून त्यांच्या प्रकरणाचा विचार करण्याची विनंती करू शकतात.

हे ही वाचा: केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकाल कधी? सविस्तर अपडेट

बृहन्मुंबईतील खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य

Brihanmumbai Municipal Corporation (बृहन्मुंबई महानगरपालिका) शिक्षण विभागाने खासगी प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार महानगरपालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित तसेच विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यात आली आहे.

हे ही वाचा: शिक्षकांना TET अनिवार्यच? काय सांगतो शिक्षण विभागाचा नवीन निर्णय?

सेवासातत्य आणि पदोन्नतीसाठी TET पास करणे आवश्यक

या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, शिक्षकांना सेवा सुरू ठेवण्यासाठी (सेवासातत्य) तसेच भविष्यात मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे जे शिक्षक अद्याप TET पास नाहीत त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासनाचा निर्णय

Supreme Court of India यांच्या याचिका क्र. 1385/2025 मधील निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना ही माहिती कळवली आहे.

शाळा निरीक्षकांना शिक्षकांना सूचना देण्याचे निर्देश

या संदर्भात सर्व विभाग निरीक्षक (शाळा) यांना त्यांच्या अखत्यारितील खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना ही माहिती तातडीने कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित सर्व शिक्षकांनी या परिपत्रकाची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा: केंद्र सरकारचे राज्य सरकारांना पत्र सविस्तर वाचा

RTE Act 2009 नुसार TET परीक्षा ही शिक्षकांसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच Supreme Court of India यांच्या निर्णयानंतर (TET Exam Supreme Court Decision) शिक्षण क्षेत्रात या नियमांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे होताना दिसत आहे. यामुळे शिक्षकांनी भविष्यातील सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीच्या संधी मिळवण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक ठरणार आहे. संबंधित सर्व शिक्षकांनी या निर्णयाची नोंद घेऊन वेळेत आवश्यक पात्रता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी: बृहन्मुंबईतील खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य करणेबाबत परिपत्रक वाचा. तसेच TET परीक्षा पात्रते संदर्भात शासन निर्णय डाउनलोड करा.

TET Exam bmc Circuler

TET शिक्षक पात्रता परीक्षा अपडेट्स

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment