महाराष्ट्र राज्यातील लाखो शिक्षकांचे लक्ष सध्या केंद्रप्रमुख भरतीकडे लागले आहे. दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ४६,०६८ शिक्षक प्रविष्ट झाले होते. ‘केंद्रप्रमुख’ हे पद आता ‘समूह साधन केंद्र समन्वयक’ या नावाने ओळखले जाणार आहे. या केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकाल घोषित करण्यात आला आहे.
केंद्रप्रमुख निकाल यादी 1 डाउनलोड करा
केंद्रप्रमुख निकाल यादी 2 डाउनलोड करा
केंद्रप्रमुख निकाल यादी 3 डाउनलोड करा
केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकाल जाहीर
राज्यातील शिक्षण विभागाचा कणा मानल्या जाणाऱ्या केंद्रप्रमुख पदासाठीची परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली आहे. या परीक्षेचा निकाल कधी लागणार? याबाबत विधानसभेत बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की, सध्या राज्यात केंद्रप्रमुखांची 50 टक्के पदे पदोन्नतीने तर 50 टक्के पदे थेट भरतीद्वारे भरली जात आहेत.
पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि थेट भरतीची कार्यवाही यापूर्वीच सुरू झाली असून, केंद्रप्रमुख पदाची परीक्षा घेण्यात आली आहे.
केंद्रप्रमुख पदाचे नवीन नाव, रिक्त जागा आणि वेतनश्रेणी
शासनाने या पदाच्या नावात आणि कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल केला असून, ‘केंद्रप्रमुख’ हे पद आता ‘समूह साधन केंद्र समन्वयक’ या नावाने ओळखले जाईल. पदनाम बदलले असले तरी या पदासाठीची पूर्वीचीच पात्रता आणि नेमणुकीची पद्धत लागू असणार आहे.
- एकूण मंजूर पदे: ४,८६०
- या भरतीद्वारे भरायची पदे: २,४१० (जिल्हा परिषदांमधील पदे)
- वेतनश्रेणी (Pay Scale): एस १५: ४१,८०० – १,३२,३०० (kendra pramukh salary in maharashtra)
हे ही वाचा: केंद्रप्रमुख भरती जिल्हा निहाय रिक्त जागा पाहा
केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकाल जाहीर
उमेदवार केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकाल तारीख जाहीर झाला आहे. म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी निकाल जाहीर
हे ही वाचा: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? आदेश जारी
केंद्रप्रमुख (समूह साधन केंद्र समन्वयक) भरती परीक्षेचा निकाल कसा आणि कोठे पाहावा?
उमेदवारांना त्यांचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) च्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. ही परीक्षा IBPS मार्फत घेण्यात आल्यामुळे, निकालाची लिंक MSCE च्या वेबसाईटवरून IBPS च्या पोर्टलवर रीडायरेक्ट होईल.
निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात. निकाल तपासण्यापूर्वी उमेदवारांकडे खालील माहिती तयार असणे आवश्यक आहे:
- नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा रोल नंबर (Roll Number)
- पासवर्ड (Password) किंवा जन्मतारीख (Date of Birth)
केंद्रप्रमुख परीक्षा निकाल पाहण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
१. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: सर्वांत आधी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. (वेबसाईट: https://www.mscepune.in/)
२. निकालाच्या लिंकवर क्लिक करा: वेबसाईटच्या होमपेजवर समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ या विभागात निकालाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. लॉगिन पेज: लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल.

४. माहिती भरा: तिथे विचारलेल्या रकान्यांमध्ये तुमचा ‘Registration Number / Roll Number’ आणि ‘Password / DOB’ अचूक टाका.
५. कॅप्चा (Captcha) टाका: स्क्रीनवर दिसणारा सिक्युरिटी कोड (कॅप्चा) जसाच्या तसा रकान्यात भरा आणि ‘Login’ किंवा ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
६. निकाल डाऊनलोड करा: लॉगिन यशस्वी झाल्यानंतर तुमचा निकाल आणि प्राप्त झालेले गुण स्क्रीनवर दिसतील. भविष्यातील संदर्भासाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी निकालाची PDF डाऊनलोड (Download) करा आणि त्याची प्रिंट (Print) काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
हे ही वाचा: केंद्रप्रमुख पदांच्या भरतीचा नवीन शासन निर्णयातील तरतुदी वाचा
राज्यातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणार
राज्यातील शाळांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय आता मार्गी लागले आहेत.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यस्तरावर नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण दिले जात असून, त्यांचे अशैक्षणिक काम कमी करण्यावर शासनाचा विशेष भर आहे.
याशिवाय, येत्या मार्च महिन्यापर्यंत राज्यातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शाळेत जिल्हास्तरावर सीसीटीव्ही बसविण्याचे कामही सुरू आहे. येत्या वर्षभरात राज्यात ‘मॉडेल शाळा’ तयार करण्याचे प्रस्तावित असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल प्रत्यक्ष दिसून येतील, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.
शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी विविध निधींचा वापर
विधानसभेत सदस्य अभिमन्यू पवार यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे लातूर जिल्ह्यातील १२६७ शाळांपैकी निम्म्याहून अधिक शाळा मोडकळीस आल्याचा गंभीर मुद्दा मांडला. अनेक शाळा धोकादायक स्थितीत असून वीज खंडित असणे, मूलभूत सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची कमतरता यावर सविस्तर चर्चा झाली. या महत्त्वपूर्ण चर्चेत विधानसभा सदस्य डॉ. विश्वजीत कदम, श्वेता महाले, अमित साटम, सिद्धार्थ शिरोळे, संजय मेश्राम, रोहित पाटील व कॅप्टन तमिल सेल्वन यांनीही सहभाग नोंदवला.
यावर उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे यांनी माहिती दिली की, राज्यातील शाळांची भौतिक अवस्था सुधारण्यासाठी शासनाकडून विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये केवळ राज्य व केंद्र शासनाचा निधीच नाही, तर जिल्हा नियोजन समिती, मनरेगा (कंपाऊंड वॉल सारख्या कामांसाठी), जिल्हा परिषदेचा सेस निधी, स्थानिक विकास निधी, गौण खनिज निधी, सीएसआर (CSR) फंड आणि खासदार/आमदार निधी यांचाही प्रभावी वापर करून शाळांमध्ये दर्जेदार सुविधा उभारल्या जात आहेत.
एकूणच, राज्य शासन शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. परीक्षा दिलेल्या सर्व शिक्षकांनी (Kendrapramukh Bhrati Exam Result) च्या अधिकृत अपडेट्ससाठी https://www.mscepune.in/ या संकेतस्थळास भेट देत राहावी. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन राज्याला नवीन आणि कार्यक्षम ‘समूह साधन केंद्र समन्वयक’ मिळतील.









