केंद्रप्रमुख परीक्षा निकाल: TET/CTET माहिती भरण्यासाठी नवीन लिंक सुरू – MSCE Pune

Published On: March 16, 2026
Follow Us
kp result tet ctet info link

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (msce pune) यांनी आयोजित केलेल्या समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीझाला आहे. निकालानंतर आता पात्र उमेदवारांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली असून, TET किंवा CTET उत्तीर्ण असल्याची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत सूचनेनुसार उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर १६ मार्च २०२६ ते २१ मार्च २०२६ या कालावधीत आवश्यक माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत वाढविण्यात आल आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना Response Sheet आणि गुणपडताळणीसाठीही स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रप्रमुख परीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

केंद्रप्रमुख परीक्षा निकाल: TET/CTET माहिती भरणे बाबत प्रसिध्दी निवेदन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४

“समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५”

प्रसिध्दी निवेदन

महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्र. संकीर्ण२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दिनांक १५.०९.२०२२ व शासननिर्णय दि. २९.०८.२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दि. ०३.०२.२०२६ व दि. ०४.०२.२०२६ या कालावधीत तीन सत्रात आयोजन करण्यात आले होते.

सदर परीक्षेचा निकाल दि.१३.०३.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर परीक्षेत पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)/CTET या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर दि. १६.०३.२०२६ ते दि. २१.०३.२०२६ पर्यंत भरण्यात यावी. सदरची माहिती दिलेल्या लिकंमध्येच भरण्यात यावी.

  • खालील दिलेली माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी.
  • Note – जर TET व CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल, तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची माहिती खालील लिंक मध्ये भरण्यात यावी. TET /CTET परीक्षा देताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल, तेच या ठिकाणी नमूद करावे.
  • खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक भरावी. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करता येणार नाही.
  • सदर माहिती भरण्याची मुदत दि. १६/०३/२०२६ ते ३१/०३/२०२६ पर्यंत आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
kp result tet ctet info msce pune

ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

तसेच, सदर परीक्षेची गुणपडताळणी/Response Sheet उपलब्ध करुन घेण्यासाठी https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx या लिंकवर दि. १६.०३.२०२६ ते दि. ३१.०३.२०२६ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

kp result gun padtalani

गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रती पेपर रुपये ५००/- सदर लिंकद्वारे भरण्यात यावेत. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर Response Sheet उपलब्ध करुन देण्यात येईल. ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे सादर केलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी: केंद्रप्रमुख परीक्षा निकाल: TET/CTET माहिती भरणे बाबत प्रसिद्धी पत्रक पीडीएफ डाउनलोड करा

केंद्रप्रमुख भरती

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment