MSCE Pune Kendrapramukh Result 2026 जाहीर करण्यात आला असून, केंद्रप्रमुख भरती परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Pune) यांच्या mscepune.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. उमेदवारांना आपला निकाल ऑनलाइन पद्धतीने तपासता येणार आहे.
या निकालामध्ये उमेदवारांची मेरिट लिस्ट, गुणपत्रक (Scorecard) आणि पात्रता स्थिती पाहता येईल. तसेच आता उमेदवारांना TET / CTET माहिती भरणे बंधनकारक आहे. सविस्तर माहिती पाहूया.
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल प्रसिद्धी पत्रक
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते.
सदर परीक्षेस एकूण ४६०६८ परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. त्यापैकी परीक्षेस एकूण ३८५५८ परीक्षार्थी उपस्थित होते.
सदर परीक्षेचा निकाल दि.१३/०३/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या परीक्षार्थी/उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
TET / CTET पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
जे उमेदवार TET किंवा CTET परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी सर्वात प्रथम उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची माहिती भरणे आवश्यक आहे.
यासाठी स्वतंत्र लिंक लवकरच MSCE Pune च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. माहिती भरताना अर्जामध्ये नमूद केलेला प्रवर्ग, दिव्यांगत्व किंवा इतर तपशील तसाच नमूद करणे आवश्यक आहे.
तरी संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
MSCE Pune Kendrapramukh Result PDF Download
- MSCE Pune च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल लिंकवर क्लिक करा.
- समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल प्रसिद्धी निवेदन
- समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी 1
- समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी 2
- समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ निकाल गुणयादी 3
अधिक माहितीसाठी : MSCE Pune यांच्या https://mscepune.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.










