MahaJyoti MPSC Result: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी 2025-26 या वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या MPSC राज्यसेवा आणि संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
ज्या उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा दिली होती, त्यांना आता त्यांचे MahaJyoti MPSC Result महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. याबाबत महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी परिपत्रक काढून सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.
प्रवेश प्रक्रिया
महाज्योतीने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे.
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) साठी: राज्यसेवा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी पुण्यातील ‘ज्ञानदीप ॲकॅडमी’ (टिळक रोड, सदाशिव पेठ) हे केंद्र देण्यात आले आहे.
2. संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ साठी: या परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील खालील केंद्रांचे वाटप करण्यात आले आहे:
भगिरथ स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे (नारायण पेठ) एच. व्ही. देसाई अकॅडमी, पुणे (शनिवार वाड्यामागे)
संबोधी अकॅडमी, पुणे (सदाशिव पेठ) रिलाएबल स्पर्धा परीक्षा केंद्र, छ. संभाजीनगर (पैठण गेट)
विद्यार्थ्यांनी आपापल्या वाटप झालेल्या केंद्रावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. तुम्ही तुमचा MahaJyoti MPSC Result आणि केंद्राची माहिती संकेतस्थळावर तपासून घेणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे (Documents List)
प्रवेश प्रक्रियेसाठी केंद्रावर जाताना उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि स्वयं-साक्षांकित (Self-attested) झेरॉक्स सोबत नेणे आवश्यक आहे:
- आधारकार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका/प्रमाणपत्र किंवा उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
महाज्योती मोफत टॅब साठी 3500 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अटी आणि शर्ती
महाज्योतीने काही कडक नियम देखील घालून दिले आहेत, ज्याची विद्यार्थ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे:
निवास व भोजन: प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय स्वतःच करावी लागणार आहे. महाज्योतीतर्फे ही सुविधा पुरवली जाणार नाही.
एकच प्रशिक्षण: ज्या विद्यार्थ्यांची निवड एकापेक्षा जास्त परीक्षांसाठी (उदा. राज्यसेवा, UPSC किंवा गट ब व क) झाली असेल, त्यांनी कोणत्याही एकाच प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावा.
सारथी किंवा दुबार लाभ: जर एखाद्या विद्यार्थ्याने यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल किंवा त्यांचे नाव ‘सारथी’ संस्थेच्या निवड यादीत असेल, तर त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
केंद्र बदल: कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण केंद्र बदलून मिळणार नाही.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी त्वरित महाज्योतीच्या वेबसाईटला भेट देऊन आपला MahaJyoti MPSC Result तपासावा आणि दिलेल्या मुदतीत संबंधित ॲकॅडमीमध्ये संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी महाज्योती कार्यालयाशी किंवा संबंधित ॲकॅडमीच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
MahaJyoti MPSC Result PDF Download
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षापूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता मेरीट व निवड यादी डाउनलोड करा (सूचना पत्रक)
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (संयुक्त गट ब व क) परीक्षापूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता मेरीट व निवड यादी डाउनलोड करा (सूचना पत्रक)
- अधिकृत वेबसाईट : https://mahajyoti.org.in/



