शिक्षण विभागाचा मोठा दणका! दिशाभूल करणाऱ्या शाळांची नावे आता बदलणार; नवीन नियम लागू

By MarathiAlert Team

Published on:

Maharashtra School Name Change Policy :आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. अनेकदा शाळेच्या नावात असलेल्या ‘International’, ‘Global’ किंवा ‘CBSE’ या भारदस्त शब्दांना भूलून पालक महागड्या फी भरून प्रवेश घेतात. मात्र, आता अशा दिशाभूल करणाऱ्या शाळांवर राज्य शासनाने चाप लावला आहे. शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यासंदर्भात कडक पावले उचलली असून, अनेक शाळांना आपली नावे बदलण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra School Name Change Policy काय आहे?

नेमका प्रकार काय आहे? राज्यात अशा अनेक स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत ज्या राज्य मंडळाशी (State Board) संलग्न आहेत, परंतु त्यांच्या नावामध्ये ‘International’, ‘Global’ किंवा ‘CBSE’ यांसारख्या शब्दांचा वापर केला जातो.

काही शाळांच्या नावात ‘English Medium’ असा उल्लेख असतो, पण कागदोपत्री त्यांची मान्यता ‘मराठी माध्यम’ अशी असते. अशा नावामुळे समाज, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठी दिशाभूल होते आणि त्याचा त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

ही फसवणूक थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने Maharashtra School Name Change Policy ची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.

शाळेचे नाव ठरवण्यासाठीचे नवीन नियम

शिक्षण संचालनालयाने १५ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, खालील बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

International/Global: जर एखाद्या शाळेला आपल्या नावात ‘International’ किंवा ‘Global’ हे शब्द वापरायचे असतील, तर त्या शाळेच्या शाखा परदेशात असणे अपेक्षित आहे. तसेच, त्या शाळेची संलग्नता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळाशी असणे आवश्यक आहे.

CBSE: शाळेच्या नावामध्ये ‘CBSE‘ हा शब्द वापरणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. कारण ‘CBSE’ हे केंद्र शासनाद्वारे स्थापित एका परीक्षा मंडळाचे नाव आहे, ते शाळेचे नाव असू शकत नाही.

शाळांना सुधारणेच्या सूचना राज्यातील शाळांच्या नावांमध्ये असलेली ही तफावत दूर करण्यासाठी Maharashtra School Name Change Policy अंतर्गत क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

नवीन शाळांच्या मान्यता प्रस्तावांची किंवा दर्जावाढ प्रस्तावांची छाननी करताना, अशा दिशाभूल करणाऱ्या नावांचा वापर टाळला जावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या शाळांची नावे नियमात बसत नाहीत, त्यांना नावे बदलण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर, माहे डिसेंबर २०२५ मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी सुमारे ११ शाळांच्या नावाबाबत आक्षेप घेण्यात आला असून, त्यांची नावे बदलून किंवा खातरजमा करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

यामध्ये सांगली, कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील काही नामांकित संस्थांच्या शाळांचाही समावेश आहे.

पालकांसाठी दिलासा केवळ नाव मोठे आहे म्हणून शाळेत प्रवेश घेणाऱ्या पालकांसाठी हा निर्णय डोळे उघडणारा आहे. शाळेचे नाव, त्यांचे संलग्न मंडळ (Board) आणि माध्यम यांचा ताळमेळ असणे आता अनिवार्य असणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांनाही या निर्णयानुसार कार्यवाही करावी लागणार आहे.

शासनाच्या या Maharashtra School Name Change Policy मुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल आणि पालकांची होणारी फसवणूक टळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र शाळांच्या नावाबाबत परिपत्रक डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!