Majhi Ladaki Bahin Yojana eKYC: राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या 2 कोटी 43 लाखांहून अधिक महिलांसाठी महिला व बाल विकास विभागाकडून महत्वाची लेटेस्ट अपडेट्स आहे. 31 डिसेंबरपूर्वी ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा दरमहा मिळणारे 1500 रुपये बंद होऊ शकतात. जाणून घ्या E-KYC ची सोपी पद्धत.
तुम्हाला दर महिन्याला सरकारकडून मिळणारे 1500 रुपये असेच अखंडपणे सुरू ठेवायचे असतील, तर तुमच्याकडे आता खूप कमी वेळ उरला आहे. सरकारने Majhi Ladaki Bahin Yojana eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत दिली आहे.
आता हातात फक्त 4 दिवस उरले आहेत. जर तुम्ही वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमच्या हक्काचे पैसे अडकू शकतात.
E-KYC साठी उरले फक्त 4 दिवस
मंत्री अदिती तटकरे यांचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, “योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-KYC करणे बंधनकारक आहे.
यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असून आता केवळ काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय पैसे मिळवण्यासाठी सर्व बहिणींनी त्वरित आपली ई-केवायसी पूर्ण करावी.”
थोडक्यात सांगायचे तर, सरकारने स्पष्ट संदेश दिला आहे – “नो केवायसी, नो पैसा.” त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच हे काम उरकून घेणे फायद्याचे ठरेल.
E-KYC करताना चूक झाली असेल तर सुधारण्याची शेवटची संधी
या महिलांनी काय काळजी घ्यावी? (महत्त्वाची सूचना) सरकारी नियमांनुसार, ज्या लाभार्थी महिला अनाथ आहेत, ज्यांचे पती हयात नाहीत (विधवा) किंवा ज्या घटस्फोटित आहेत, त्यांच्यासाठी विशेष सूचना आहेत.
अशा महिलांनी स्वतःची ई-केवायसी करणे अनिवार्य आहेच.
यासोबतच त्यांना आपल्या पतीचे/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा कोर्टाच्या आदेशाची सत्यप्रत (Verified Copy) 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागेल. (लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलांना e-KYC मधून सूट; शिफारस नमूना पत्र डाउनलोड करा)
चूक झाली असेल तर सुधारण्याची शेवटची संधी अनेकदा घाईगडबडीत फॉर्म भरताना चुका होतात. ज्या महिलांनी आधीच Majhi Ladaki Bahin Yojana eKYC केली आहे, पण त्यात काही माहिती चुकीची भरली गेली असेल, तर घाबरण्याचे कारण नाही.
तुम्हाला तुमची चूक सुधारण्याची एक शेवटची संधी देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून माहिती अपडेट करू शकता.
फक्त 2 मिनिटात अशी करा E-KYC (स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)
तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
- सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (ladakibahin.maharashtra.gov.in) जा.
- होमपेजवर तुम्हाला ‘e-KYC’ चा बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा.
- तुमचा आधार नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका आणि ‘Send OTP’ म्हणा.
- तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो टाकून सबमिट करा.
- जर तुमची केवायसी आधीच झाली असेल, तर तसा मेसेज स्क्रीनवर येईल.
- जर झाली नसेल आणि तुम्ही पात्र असाल, तर पुढची विंडो ओपन होईल.
- तेथे पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाका आणि पुन्हा OTP व्हेरिफिकेशन करा.
- तुमची जात (Category) निवडा.
- शेवटी, “घरात कोणीही सरकारी नोकरीत नाही” आणि “एकाच महिलेला लाभ मिळत आहे” या दोन घोषणांवर (Self-declaration) टिक करा.
- ‘Submit’ बटन दाबा.
- “Success” असा मेसेज आल्यावर तुमचे काम झाले!
Ladaki Bahin Yojana eKYC अधिकृत लिंक
- Majhi Ladaki Bahin Yojana eKYC – Direct Link
- अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
मैत्रिणींनो, 1500 रुपयांची मदत ही आपल्यासाठी मोठा आधार आहे. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे हा लाभ थांबू देऊ नका. आजच आपली Majhi Ladaki Bahin Yojana eKYC पूर्ण करा आणि ही माहिती तुमच्या ओळखीच्या इतर महिलांनाही शेअर करा.

















