जर तुम्ही आरोग्य विभागात नोकरीच्या शोधात असाल आणि रायगड जिल्ह्यात काम करण्याची इच्छा असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, यामुळे तुम्हाला सरकारी यंत्रणेसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
भरती कोणामार्फत होत आहे?
रायगड जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. (NHM Raigad Recruitment 2026) अंतर्गत मंजूर असलेली विविध पदे ही निव्वळ कंत्राटी पद्धतीची (Contract Basis) आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना २९ जून २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी नियुक्ती दिली जाईल.
कोणत्या पदांसाठी आहे संधी?
या भरतीमध्ये आरोग्य विभागातील वेगवेगळ्या संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील पदांचा समावेश आहे:
स्टाफ नर्स (Staff Nurse): पुरुष उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW): १५ वा वित्त आयोग आणि ‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत ही पदे भरली जातील.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician): NTEP आणि BPHU कार्यक्रमांतर्गत.
इतर तांत्रिक पदे: यामध्ये फार्मासिस्ट (Pharmacist), दंत तंत्रज्ञ (Dental Technician), फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist), ऑडिओलॉजिस्ट आणि विविध कन्सल्टंट (Consultant) पदांचा समावेश आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड भरती २०२६ च्या जाहिरातीनुसार एकूण १४५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- स्टाफ नर्स आणि MPW: ४८ पदे (स्टाफ नर्स- १३, MPW- ३५)
- BPHU अंतर्गत पदे (कीटकशास्त्रज्ञ, तज्ज्ञ, तंत्रज्ञ): ५१ पदे
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NTEP): ६ पदे
- विविध समन्वयक आणि व्यवस्थापक: ९ पदे
- तांत्रिक आणि वैद्यकीय पदे (फार्मासिस्ट, डेंटिस्ट इ.): ३१ पदे
- एकूण: १४५ पदे
शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना अर्ज करता येणार असून, पदानुसार मानधन हे १८,००० रुपयांपासून ते ४०,००० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे.
ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असून, एकूण रिक्त पदांची संख्या मोठी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेनुसार पदांची खात्री करावी.
अर्ज सादर करण्याची पद्धत आणि ठिकाण
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा नसून, स्वतः प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करायचा आहे. (NHM Raigad Recruitment 2026) च्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन खालील पत्त्यावर हजर राहायचे आहे.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग (कुंटे बाग), जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग, जि. रायगड.
महत्वाच्या तारखा आणि वेळ: पदांनुसार अर्ज स्वीकारण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत:
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी: स्टाफ नर्स, MPW, Entomologist आणि लॅब टेक्निशियन (BPHU/NTEP) या पदांचे अर्ज स्वीकारले जातील.
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी: विविध समन्वयक (Coordinators), फार्मासिस्ट, डेंटिस्ट, आणि इतर तांत्रिक पदांचे अर्ज स्वीकारले जातील.
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. १२ वाजेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
वयोमर्यादा आणि फी: या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे आहे. मात्र, रुग्णसेवेशी संबंधित पदांसाठी वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
अर्जासोबत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट (DD) जोडणे अनिवार्य आहे:
- खुल्या प्रवर्गासाठी: १५० रुपये
- राखीव प्रवर्गासाठी: १०० रुपये
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड ही थेट गुणांच्या आधारे (Merit Basis) केली जाईल. तुमच्या शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षाचे गुण आणि अनुभव यावर आधारित मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. अनुभवासाठी प्रत्येक वर्षाला ६ गुण (जास्तीत जास्त ३० गुण) दिले जातील.
महत्त्वाची सूचना: अर्ज सादर करताना सोबत सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रतिंचा संच घेऊन जाणे आवश्यक आहे. ही एक कंत्राटी भरती असली तरी, अनुभवासाठी ही (NHM Raigad Recruitment 2026) एक उत्तम संधी आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून अर्ज सादर करावा.
आधिक माहितीसाठी
- मूळ जाहिरात येथे पाहा
- अधिकृत वेबसाईट : https://zpraigad.gov.in/








