Pariksha Pe Charcha 2025 Registration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा लोकप्रिय संवादात्मक कार्यक्रम म्हणजे ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC) या कार्यक्रमाची ८ वी आवृत्ती जानेवारी २०२५ मध्ये देशातील वार्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी आयोजित करण्यात आला आहे. Pariksha Pe Charcha 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी mygov.in च्या innovateindia1.mygov.in या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी (Registration) सुरू झाली आहे, सविस्तर पाहूया.
Table of Contents
‘परीक्षा पे चर्चा’ (PPC 2025) MyGov.in पोर्टलवर नोंदणी सुरू
देशातील प्रत्येक विद्यार्थी ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे तो कार्यक्रम म्हणजे परीक्षा पे चर्चा (PPC) मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहे, परीक्षेचा ताण व तणाव कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी, शिक्षक व पालकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला हा कार्यक्रम गेली सात वर्षे सातत्याने यशस्वी ठरत आहे. या कार्यक्रमाची Pariksha Pe Charcha 2025 Registration नोंदणी सुरू झाली आहे.
परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) हा कार्यक्रम गेल्या 7 वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येतो. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे.
पीपीसी 2025 ची नोंदणी प्रक्रिया । PPC 2025 Registration Process
पीपीसी 2025 च्या नोंदणीला 14 डिसेंबर 2024 पासून MyGov.in वर सुरुवात झाली असून 14 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी सुरु असणार आहे.
- विद्यार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा
- शिक्षक नोंदणीसाठी येथे क्लिक करा
- पालक नोंदणीसाठी येथे क्लिक करा
नोंदणीची प्रक्रिया PPC 2025 Registration
Pariksha Pe Charcha 2025 Registration : इयत्ता 6वी ते 12वी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी MyGov.in पोर्टलवर प्रश्नमंजुषा (बहुपर्यायी प्रकारे) देण्यात आली आहे.
- पहिली गोष्ट, ‘सहभागी व्हा’ बटणावर क्लिक करा.
- लक्षात ठेवा, ही स्पर्धा इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
- आवश्यक माहिती भरून लॉगिन करा.
- जास्तीत जास्त 500 अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रश्न माननीय पंतप्रधानांना सादर करावा.
- पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्यासाठी केवळ डिझाइन केलेल्या ऑनलाइन उपक्रमांमध्ये त्यांच्या प्रवेशिका सादर करू शकतात.
हे ही वाचा : आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया
पीपीसी 2025 दरम्यान विचारण्यासाठी प्रश्नांची निवड
विद्यार्थी पंतप्रधानांना विचारण्यासाठी आपापल्या पसंतीचे प्रश्न नोंदणी प्रक्रियेदरम्यान देऊ शकतात. हे प्रश्न परीक्षेचा ताण, करिअर, भविष्यातील आकांक्षा किंवा एकंदर आयुष्याविषयी असू शकतात.
इयत्ता 6वी ते 12वी चे विद्यार्थी, शिक्षक आण पालकांची निवड ऑनलाईन प्रश्नमंजुषेतील सहभागावरून निश्चित केली जाईल.
पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या प्रश्नांची निवड करताना भारताच्या विविध प्रदेशातील आणि विविध विषयावरील प्रश्न विचारात घेतले जातील. यापूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये ज्याप्रमाणे परदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता तसा यंदाही केला जाईल.
नोंदणीसाठी लिंक – https://innovateindia1.mygov.in/
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू, शाळा नोंदणी डायरेक्ट लिंक