घरांवर सौर पॅनेल राज्याची नवीन योजना PM Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra

By Marathi Alert

Published on:

PM Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra: केंद्र सरकारने ० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर पॅनल बसवून ग्राहकांना वीजनिर्मितीची संधी मिळणार आहे.

यासोबतच, महाराष्ट्र शासन स्वतंत्र पूरक योजना आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“३०० युनिटपर्यंत वीज मोफत! ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेत सौर पॅनेलचा लाभ घ्या” PM Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra

केंद्र सरकारने 0 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर (रूट टॉप) सौर ऊर्जा पॅनेल बसवून दिले जाणार आहेत.

घरांवर सौर पॅनेल राज्याची नवीन योजना Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra

केंद्र सरकारच्या या योजनेला पूरक अशी स्वतंत्र योजना राज्य सरकार लवकरच आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

वीज दराबाबत प्रश्न आणि उत्तर

विधानसभेत सदस्य मुरजी पटेल यांनी वीज दरवाढीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठीचा बहुवार्षिक वीजदर याचिका (मल्टीइयर टारीफ पिटीशन) सादर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच वर्षात दरवर्षी विजेचे दर कमी होणार आहेत.”

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर!

महाराष्ट्र देशात पहिले राज्य

देशातील वीज नियामक आयोगांपैकी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी विजेचे दर कमी करणारी याचिका सादर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ संपूर्ण माहिती येथे पहा

घरांवर सौर ऊर्जा – मोफत वीज मिळवा! PM Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM सूर्या घर: मुफ्त बिजली योजना सुरू केली आहे, जी भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत आहे! मार्च २०२७ पर्यंत १ कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्याचे लक्ष्य आहे. (PM Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra)

मोफत वीज मिळवा – सरकारकडून ४०% पर्यंत अनुदान
वीजबिलात मोठी बचत – विजेचा खर्च कमी
पर्यावरणपूरक उपाय – कार्बन उत्सर्जनात घट
रोजगार संधी – १७ लाख नवीन रोजगार

योजना पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अनुदानाचा तपशील जाणून घ्या.

मुंबई शहरासाठी विशेष योजना

मुंबई शहरासाठी बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आणि महावितरण या वीज वितरण कंपन्यांनीही वीज नियामक आयोगाकडे बहुवार्षिक वीजदर याचिका सादर केली आहे. मुंबईतील मोठ्या इमारतींना पारंपरिक आणि अपारंपरिक दोन्ही मार्गांनी वीज उपलब्ध करून दिली जात आहे. ज्या इमारतींमध्ये सध्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वीज उपलब्ध करण्याची क्षमता आहे, अशा इमारतींसाठी नवीन योजना आणण्याचा सरकारचा विचार आहे.

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) जाहीर सूचना!

वीज दर निश्चितीचे अधिकार

वीज दर मान्य करण्याचे अधिकार नियामक आयोगाला आहेत. सरकारने पुढील पाच वर्षांसाठीचे दर निश्चित करून ते मान्यतेसाठी आयोगाकडे सादर केले आहेत. सर्व नियामक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2025-26 ते 2029-30 या कालावधीसाठी वीजदर आदेश जारी केले जातील. त्यानुसारच वीज वितरण कंपन्या वीज दर आकारणी करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

HSRP प्लेट: आता जुन्या वाहनांसाठी पण आवश्यक! नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

वीज दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील वीजदर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पुढील पाच वर्षांसाठी बहुवार्षिक वीजदर प्रस्ताव (Multi-Year Tariff Petition) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.

महिलांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेत मोठी घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती! 

महत्त्वाचे मुद्दे

✔ महाराष्ट्र हे दरवर्षी वीजदर कमी करणारी याचिका सादर करणारे देशातील पहिले राज्य
✔ मुंबईतील बेस्ट, टाटा पॉवर, अदाणी आणि महावितरण यांच्याद्वारेही वेगळे प्रस्ताव
✔ नवीन मोठ्या इमारतींसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचा विचार

राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी अपडेट! प्रीपेड वीज मीटर बंद – ग्राहकांना मिळणार 10% सवलत!

राज्यातील २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी वीजदर निश्चित करण्याचे अधिकार नियामक आयोगाकडे आहेत. सरकारच्या प्रस्तावानुसार प्रक्रियेचा अवलंब करून वीज दर ठरवले जातील. PM Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra

🟢 या योजनेचा लाभ घ्या आणि विजेवर बचत करा!

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: आता ११ महिन्यांपर्यंत प्रशिक्षण व ₹10,000 मानधन!

Pm Surya Ghar Muft Bijli Yojana Official Website अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmsuryaghar.gov.in/

निष्कर्ष

PM Surya Ghar Solar Panel Yojana Maharashtra: ० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही एक मोठी संधी आहे. या योजनेतून ग्राहकांना रूफटॉप सोलर पॅनेल बसवून वीज बचतीचा आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादनाचा लाभ मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारही स्वतंत्र पूरक योजना आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे नागरिकांना आणखी सहकार्य मिळेल.

यासोबतच, वीजदर कमी करण्यासाठी राज्य सरकारने पुढील पाच वर्षांसाठी बहुवार्षिक वीजदर प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामुळे दरवर्षी विजेचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

ही योजना वीज बचतीसह पर्यावरणपूरक ऊर्जेचा मार्ग मोकळा करणार असून, नागरिकांना आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!