RTE Admission Age Limit Fixed : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता इयत्ता पहिली आणि प्ले ग्रुप व नर्सरी साठी वयोमार्यादा मानिव दिनांक ३१ डिसेंबर निर्धारित करण्यात आला आहे. नवीन वयोमार्यादा किती? सविस्तर पाहूया..
सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात RTE 25 टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित (RTE Admission Age Limit Fixed) करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा प्रवेशासाठी बालकाच्या किमान व निश्चित
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दि. १८-०९-२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानवीन दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे.
शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
हे ही वाचा : आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे
- दिनांक ३१ डिसेंबर रोजी प्ले ग्रुप व नर्सरीसाठी बालकाचे किमान वय वर्ष हे ३+ ठेवण्यात आले आहे. म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी ३ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
- तर पाहिलीसाठी ६+ हे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच दिनांक ३१ डिसेंबर रोजी ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज : आरटीई 25 टक्के प्रवेश
अधिक माहितीसाठी : परिपत्रक पाहा
अधिकृत वेबसाईट : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/
हे ही वाचा : RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती