Shala Pravesh Utsav MLA MP Officers Visits Schedule : जिल्हानिहाय शाळा भेट नियोजन डाउनलोड करा

By MarathiAlert Team

Updated on:

Shala Pravesh Utsav MLA MP Officers Visits Schedule राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! सोमवार, १६ जून, २०२५ पासून विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांमधील शाळा पुन्हा सुरू होत आहेत. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच शाळा प्रवेश उत्सवासाठी आमदार, खासदार आणि अधिकारी देखील शाळांना भेटी देणार आहेत. भेटीचे वेळापत्रक तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करू शकता.

Shala Pravesh Utsav MLA MP Officers Visits Schedule

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर जिल्ह्यातील दुर्वेस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील मनपा शाळा क्रमांक २३ (किसन नगर) आणि वडाळ्यातील शिवडी वडाळा इस्टेट मनपा शाळेत (आंध्रा हायस्कूलजवळ) उपस्थित राहतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आणि बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देतील.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तुंगण दिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. याशिवाय, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर वर्धा जिल्ह्यातील करंजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करतील.

या मान्यवरांव्यतिरिक्त, राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील तालुका अंतर्गत शाळा भेटी नियोजनाची माहिती खालील लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता.

Shala Pravesh Utsav MLA MP Officers Visits Schedule Download

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!