शिक्षक भरतीची सुवर्णसंधी! पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी मुदतवाढ! Shikshak Bharti 2025

Published On: March 1, 2025
Follow Us
Shikshak Bharti 2025

Shikshak Bharti 2025: पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ मार्च २०२५ पर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करता येणार आहे.

पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी मुदतवाढ! Shikshak Bharti 2025

शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. पवित्र पोर्टलद्वारे (Pavitra Portal) शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती जाहिरात देण्याची सुरुवात दि २० जानेवारी २०२५ रोजी सर्व व्यवस्थापनांना पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती, ज्याची मुदत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत होती.

आजपर्यंत राज्यातील १७२१ व्यवस्थापनांनी १९०२ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची जाहिरात देण्यासाठी १५ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीबाबत शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

  • अधिक माहितीसाठी: https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
  • मदतीसाठी: edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधा.

राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या अधिनस्त शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात द्यावी.

राज्यातील या उमेदवारांना ‘शिक्षण सेवक’ योजना लागू न करता थेट नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्याबाबत – शासन निर्णय

पोस्ट ऑफिस भरती 2025! कोणतीही परीक्षा नाही – थेट मेरिट लिस्टवर निवड!

शिक्षण सेवक: सुधारित मानधन शासन निर्णय

महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरती (Shikshak Bharti 2025) अंतर्गत नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करावे, लागते. या कालावधीत सुधारित मानधनानुसार खालीलप्रमाणे मानधन मिळते.

  • प्राथमिक, उच्च प्राथमिक – 16000 रुपये
  • माध्यमिक – 18000 रुपये
  • उच्च माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालय – 20000 रुपये
  • शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ मानधन – 14000 रुपये
  • प्रयोगशाळा सहायक कनिष्ठ लिपिक – 12000 रुपये
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी – 8000 रुपये

महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता कधी जमा होणार? त्वरित चेक करा!

प्राध्यापक भरतीसाठी नवीन कार्यपद्धती जाहीर, भरती प्रक्रियेत काय बदल? जाणून घ्या

सुधारित मानधन वाढ शासन निर्णय

  1. शिक्षक (शिक्षण सेवक) सुधारित मानधन वाढ शासन निर्णय येथे डाउनलोड करा.
  2. चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुधारित मानधन वाढ शासन निर्णय येथे डाउनलोड करा.
  3. आश्रमशाळांतील शिक्षणसेवकांचे सुधारित मानधन शासन निर्णय येथे पहा

कर्मचाऱ्यांच्या पगारात भरीव वाढ

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment