Special Teachers Salaries: राज्यातील माध्यमिक स्तरावरील अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विशेष शिक्षकांचे थकीत वेतन मंजूर करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय 26 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी निधी वितरित – शासन निर्णय निर्गमित
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विशेष शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत राज्य शासनाने थकीत वेतनासाठी तब्बल २२ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून आपल्या हक्काच्या पैशांची वाट पाहणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, Special Teachers Salaries संदर्भातील हा निर्णय २६ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
नेमका विषय काय आहे?
अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत (माध्यमिक स्तर) कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे वेतन अनेक दिवसांपासून थकीत होते. या विरोधात शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
शासनाविरोधात अवमान याचिका (Contempt Petitions) दाखल करण्यात आल्या होत्या. अखेर न्यायालयाच्या दणक्यानंतर शिक्षण विभागाने वेतनापोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.
निधीचे स्वरूप आणि लाभार्थी: शासनाने मंजूर केलेला एकूण २२ कोटी ४२ लाख ५९ हजार ७२९ रुपयांचा निधी खालीलप्रमाणे वितरित केला जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालय याचिका: याचिका क्रमांक १६३७८/२०२५ मधील ५७ याचिकाकर्ते विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी १८ कोटी २० लाख ८१ हजार ७३५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
औरंगाबाद खंडपीठ याचिका: याचिका क्रमांक १२७/२०२५ आणि ४३१/२०२५ मधील १४ विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी ४ कोटी १ लाख ६४ हजार ८०६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
फरकाची रक्कम: याव्यतिरिक्त, शासन स्तरावरील चौकशी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेल्या १६१ शिक्षकांपैकी धुळे व जळगाव जिल्ह्यातील ५ विशेष शिक्षकांच्या वेतनातील तफावतीची रक्कम (२० लाख १३ हजार १८८ रुपये) देखील मंजूर करण्यात आली आहे.
Special Teachers Salaries बाबत शासनाचे कडक निर्देश हा निधी वितरीत करताना शासनाने शिक्षण संचालकांना (प्राथमिक, पुणे) स्पष्ट सूचना दिल्या आहेत. न्या
यालयाच्या आदेशानुसार ही रक्कम संबंधित शिक्षकांच्या खात्यात तातडीने जमा करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.
तसेच, Special Teachers Salaries साठी आवश्यक असलेल्या रकमेची परिगणना आणि पडताळणी करूनच निधी वितरित करावा, जेणेकरून यामध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही.
हा निधी समग्र शिक्षा योजनेच्या SNA खात्यात जमा करून तिथून तो वितरित केला जाणार आहे. न्यायालयाच्या लढ्याला आलेले हे यश विशेष शिक्षकांसाठी नक्कीच आनंददायी आहे.
विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनाचा शासन निर्णय येथे डाउनलोड करा












