11th Admission Schedule Regular Round 1 शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी इ. ११वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ च्या नियमित फेरी-१ साठीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी वेळेत सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
11th Admission Schedule Regular Round 1
नियमित फेरी-१ मधील महत्त्वाचे टप्पे: 11th Admission Schedule Regular Round 1
- डेटा प्रोसेसिंग व अलॉटमेंट जाहीर करणे:
- २४ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत डेटा प्रोसेसिंगची प्रक्रिया सुरू राहील. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही, कारण CAP अंतर्गत प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म यापूर्वीच भरलेले आहेत.
- २६ जून २०२५ रोजी नियमित फेरी-१ साठीचे अलॉटमेंट पोर्टलवर जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांच्या आणि कॉलेजच्या लॉगिनमध्ये तपशील दर्शविला जाईल आणि विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवले जातील. याच दिवशी प्रवेश फेरीसाठीची कट-ऑफ यादी देखील प्रदर्शित केली जाईल.
- विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे:
- २७ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते ०३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
- विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये अलॉटमेंट तपशील तपासावा, उर्वरित कागदपत्रे अपलोड करावीत आणि अलॉटेड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
- ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय मिळालेले नाही, त्यांना पुढील फेरीत पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल.
- ज्युनिअर कॉलेज द्वारे प्रवेश प्रक्रिया:
- २७ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते ०३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत महाविद्यालये प्रवेशासाठी अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील आणि कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करतील.
- विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील.
- नवीन विद्यार्थी नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग-१ भरणे सुरू राहील.
- ०३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०८:०० वाजेपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करण्यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त वेळ दिला जाईल.
कोटा प्रवेश कार्यवाही:
- २४ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी कोटा चॉईस/कोटा पसंती ऑनलाइन नोंदवून लॉक करणे आवश्यक आहे (नियमित फेरी-१ मध्ये कोटांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे).
- २६ जून २०२५ रोजी कोटांतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये दर्शविली जाईल (इनहाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोटा).
- २७ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते ०३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत महाविद्यालये प्रवेशासाठी कोटानिहाय गुणवत्ता यादी/निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करतील आणि प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना सूचित करतील.
- याच कालावधीत, संबंधित कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
- महाविद्यालये पात्र विद्यार्थ्यांचे कोटांतर्गत प्रवेश निश्चित करतील आणि त्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करतील.
- प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, महाविद्यालये कोटांतर्गत रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित/सरेंडर करतील.
पुढील टप्पे:
- ०४ जुलै २०२५ रोजी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील (व्हॅकन्सी).
- ०४ जुलै २०२५ रोजी पुढील फेरीसाठी CAP ऑप्शन्स/पसंतीक्रम ऑनलाइन नोंदविणे व भाग-२ लॉक करणे तसेच विद्यमान नोंदणीकृत विद्यार्थ्यांना भाग-१ एडिट करता येणे सुरू होईल.
- त्याच दिवशी, पुढील फेरीसाठी कोटा चॉईस/कोटा पसंती ऑनलाइन नोंदविणे लॉक करणे सुरू होईल.
सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
- नियमित फेरी 1 चे वेळापत्रक येथे डाउनलोड करा
- अधिकृत वेबसाईट : https://mahafyjcadmissions.in/
