शिक्षण विभागाचे कामकाज होणार ऑनलाईन: सहाव्या वेतन आयोगाचे थकित हप्ते ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 6th Pay Commission Arrears Maharashtra

By Marathi Alert

Updated on:

6th Pay Commission Arrears Maharashtra: शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते प्रलंबित असल्याने विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबत महत्वपूर्ण खुलासा केला आहे.

सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू 6th Pay Commission Arrears

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते लवकरच अदा होणार आहेत. शासनाने १२ जून २००९ आणि १७ फेब्रुवारी २०२१ च्या निर्णयांनुसार आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळेतील भविष्य निर्वाह निधी, एनपीएस व डिसीपीएस खाते असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाचे थकित हप्ते अदा करण्यात आलेले आहेत.

अमरावती विभागातील उशिराने एनपीएस (National Pension System) क्रमांक घेतलेल्या १०८ कर्मचाऱ्यांचे प्रलंबित हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू असून, ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल. (6th Pay Commission Arrears Maharashtra)

8 व्या वेतन आयोगाची घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट! पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा!

विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेत जयंत आसगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सुधाकर आडबाले यांनी सहभाग घेतला.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! 

उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, एनपीएस (NPS) किंवा डीसीपीएस (Defined Contribution Pension System) खाते निवडणे आणि त्याचा क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल दिसून येतील.

खुशखबर! राज्यातील लाखो निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा! महागाई भत्त्यात भरघोस वाढ!

शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाईन होणार

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले की, विभागाचे कामकाज अधिकाधिक डिजिटल व वेगवान करण्यासाठी मोठे बदल होत आहेत.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

गुड न्यूज! राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता लागू, X, Y, Z वर्गातील शहरे आणि गावे

शाळांच्या सुस्थितीसाठी रोडमॅप तयार करणार

राज्यातील शाळा सुस्थितीत राहाव्यात यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शाळा सुधारण्यासाठी विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

राज्यातील शाळांची स्थिती:

विक्रम काळे यांनी राज्यातील शाळांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना भुसे म्हणाले, राज्यातील 24 हजार 152 अनुदानित खासगी शाळांपैकी अनेक शाळा सुस्थितीत आहेत. खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा पुरवणं गरजेचं आहे. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे.

शिक्षक भरती अपडेट: दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात प्रक्रियेस मुदतवाढ!

आरटीई निधी लवकरच:

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) चा निधी लवकरच दिला जाईल, असंही भुसे यांनी सांगितलं.

आरटीई 25% प्रवेशासाठी मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत पर्यंत प्रवेश निश्चित करा – महत्त्वाच्या सूचना

सारांश

6th Pay Commission Arrears Maharashtra: शालेय शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्यांबाबत गंभीर आहे. अमरावती विभागातील प्रलंबित हप्ते 31 मार्चपर्यंत दिले जातील. तसेच, विभागाचे कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर वाढवला जाईल.

राज्यातील शाळा सुस्थितीत राहाव्यात यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शाळा सुधारण्यासाठी विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच RTE चा निधी लवकरच दिला जाणार आहे.

‘समग्र शिक्षा’ अभियानातील ३७८४ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा निर्णय! वाचा काय म्हणाले शिक्षणमंत्री!

गुड न्यूज! राज्य वेतनस्तर सुधारणा संदर्भात नवीन शासन परिपत्रक जारी; बक्षी समिती अहवाल खंड 2 स्वीकृत शासन निर्णय

Leave a Comment

error: Content is protected !!