RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती RTE Admission Process Information 2025 26

By Marathi Alert

Published on:

RTE Admission Process Information 2025 26 : राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या RTE 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. पूढील शैक्षणिक 2025 26 वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दिनांक 14 जानेवारी 2024 पासून विद्यार्थी नोंदणीला सुरुवात झाली आहे. आरटीई 25 टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते लॉटरी पद्धतीने आ र टी ई प्रवेशासाठी विद्यार्थी निवड होईपर्यंत वेगवेगळे टप्पे राबविण्यात येतात. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात दिलेली आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे

राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, सध्या शाळांची नोंदणी सुरु आहे. RTE प्रवेशासाठी लवकरच पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यापूर्वी आरटीई 25 टक्के प्रवेशाची प्रक्रिया कोणकोणत्या टप्प्यातून पार पडली जाते, याबाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Admission Process Information 2025 26

  1. शाळा नोंदणी | School Registration
  2. विद्यार्थी नोंदणी | New Registration
  3. ऑनलाईन अर्ज | RTE Online Application
  4. विद्यार्थी माहिती भरणे | Child Information
  5. ऑनलाईन अर्ज भरणे | Online Application
  6. आरटीई शाळा निवड | School Selection
  7. भरलेल्या अर्जाची स्थिती Summary – Application Details
  8. प्रवेशपत्र | Admit Card
  9. प्रवेश निश्चिती | Admission

साधारपणे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी वरील 9 प्रक्रियेतून आ र टी ई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पार पडते, याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

शाळा नोंदणी | RTE School Registration

आरटीई अंतर्गत राज्यातील शाळा नोंदणी हा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या ग्रामीण व शहरी भागातील शाळांची नोंदणी student.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर केली जाते, म्हणजेच नोंदणी झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्याना RTE 25 टक्के कोट्यातून प्रवेश दिला जातो. राज्यातील 8 हजार 845 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, यामध्ये 1 लाख 8 हजार 793 पात्र मुलांना प्रवेश मिळणार आहे. अधिक वाचा..

विद्यार्थी नोंदणी | RTE New Registration

शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होते, आरटीई २५% प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आरटीई पोर्टल वर प्रथम विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration) करावी लागते. नोंदणी करतानाची माहिती अचूक भरावी, कारण त्यामध्ये नंतर बदल करता येत नाही. त्यानंतर आपणास User ID व Password आपल्या मोबाईल नंबरवर पाठविण्यात येतो. त्याचा वापर करून RTE पोर्टल मध्ये लॉगीन करून ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. (आरटीई पोर्टल लिंक शेवटी दिली आहे.)

ऑनलाईन अर्ज । RTE Online Application

RTE पोर्टल वर https://student.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration) केल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड चा वापर करून सर्वप्रथम एक नवीन पासवर्ड तयार करून घ्यावा, कारण आरटीई प्रवेश प्रक्रिया संदर्भात आपल्याला शेवटपर्यंत युजर आयडी व पासवर्ड लागणार आहे. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्जाची स्थिती आणि पुढील प्रवेश प्रक्रिया आपल्या लॉगीन मध्ये पाहू शकतो.

New Registration मध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर माहिती अचूक भरावी, काही चुकल्यास Delete Application या बटनावर क्लिक करून अर्ज Delete करावा आणि नवीन अर्ज भरावा. (Delete Application हे ऑप्शन लॉगीन केल्यानंतर स्क्रीन वर दिसेल)

विद्यार्थी माहिती भरणे – Child Information

आरटीई २५% ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लॉगीन करावे लागते. त्यांनतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती Child Information भरावी लागते.

त्यामध्ये साधारणपणे बालकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव , गावाचे नाव, तालुका, जिल्हा पत्ता, ही संपूर्ण माहिती अचूक भरावी. त्याचबरोबर गुगल Map मधून पत्ता नोंद करावा लागतो.

हे ही वाचा : आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे

ऑनलाईन अर्ज भरणे – RTE Online Application

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेक्शन मध्ये प्रवेश घेण्याची इयत्ता, माध्यम, जात, धर्म, दिव्यांग असेल तर प्रकार, टक्केवारी आणि प्रमाणपत्र नंबर , कागदपत्र प्रुफ कोणते आहे? त्याची माहिती , मोबाईल नंबर पालकांचा इमेल आयडी, सध्याचा पत्ता इ माहिती अचूक भरावी लागते.

आरटीई शाळा निवड – School Selection

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेक्शन मधील माहिती भरल्यानंतर पुढील सेक्शन मध्ये आरटीई शाळा निवड (School Selection) करावी लागते. त्यामध्ये १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा जास्त अंतर असणाऱ्या पात्र व अपात्र शाळांची नावे दिसतात त्यानुसार योग्य शाळांची निवड करायची असते.

लोकप्रिय कार्यक्रम : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी येथे करा

भरलेल्या अर्जाची स्थिती Summary – Application Details

विद्यार्थी माहिती , ऑनलाईन अर्जातील माहिती व शाळेची निवड ही संपूर्ण माहिती आपल्याला या सेक्शन मध्ये दिसते. माहिती तपासून अचूक असल्याची खात्री करावी लागते.

त्यानंतर अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज प्रवेशासाठी रद्द होईल आणि मी त्यास सर्वस्वी जबाबदार राहील याची परवानगी द्यावी लागते. त्यानंतर

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे, सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळल्यास आणि बालकांची एकापेक्षा जास्त अर्ज भरलेला आढळल्यास आरटीई अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते याची मला पूर्ण कल्पना आहे. हे प्रमाणपत्र वाचून खात्री करावी व चेक बॉक्स मध्ये क्लिक करावे लागते. नंतर Confirm & Submit बटणावर क्लिक करावे.

  • त्यांनतर आपल्या समोर एक पॉप अप ओपन होईल त्यावर ओके केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
  • ओके बटणावर क्लिक केल्यानंतर आता Genrate Pdf या बटणावर क्लिक करावे. व pdf ची प्रिंट काढून घ्यावी.
  • ही संपूर्ण माहिती भरताना त्या त्यावेळी Save करावी लागते. याची काळजी घ्या. इथे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर आता आपणास लॉटरी निवड यादीची प्रतीक्षा करावी लागेल.

प्रवेशपत्र – Admit Card

लॉटरी व्दारे निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉगीन व्दारे Admit Card या पर्यायावर क्लिक करून Admit Card डाउनलोड करावा व त्याची प्रत घेउन मूळ कगदपत्र व झेरॉक्स प्रती घेउन तालुक्याची शिक्षण कमेटी (पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालय) येथे प्रवेश निश्चित करण्याकरीता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधावा व तसा मेसेज देखील आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होतो. Admit Card वर शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी असते.

आरटीई प्रवेश तक्रार – Grievance

जर पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील, तर पालक आपल्या तक्रारी लॉगीन करून Grievance हा पर्याय निवडून ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.

प्रवेश निश्चिती | RTE Admission

आरटीई अंतर्गत लॉटरी मध्ये नंबर लागल्यानंतर प्रवेश पत्रात नमूद पत्यावर कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शाळेत जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचे RTE Admission प्रवेश निश्चित करून घ्यावा.

आर टी ई. २५% ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हे अवश्य वाचा

  1. एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा. एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.
  2. प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास, तो रद्द [Delete Application) करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत.
  3. प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरील पत्ता अचूक भरावा.
  4. पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी.
  5. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी..
  6. यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये.

सारांश

आजच्या लेखामध्ये आपण RTE 25 टक्के प्रवेश 2025 26 प्रक्रिया (Admission Process) कशा पद्धतीने राबविली जाते, याबद्दलची Information माहिती घेतली आहे, त्यामध्ये मुलांचा आरटीई साठी ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते RTE लॉटरी आणि कागदपत्र पडताळणी नंतर आरटीई प्रवेश निश्चित करण्यापर्यंत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया : वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे

Leave a Comment

error: Content is protected !!