आरटीई २५ टक्के अंतर्गत 8845 शाळांची नोंदणी; जिल्हानिहाय RTE शाळा आणि रिक्त जागा RTE Admission Schools Vacancies

By Marathi Alert

Published on:

RTE Admission Schools Vacancies : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 8845 शाळांनी नोंदणी केली असून, 1 लाख 8 हजार 793 विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत प्रवेश मिळणार असून, शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.

आरटीई २५ टक्के अंतर्गत 8827 शाळांची नोंदणी; जिल्हानिहाय RTE शाळा आणि रिक्त जागा

पुणे जिल्ह्यातील 932 शाळांची नोंदणी झाली असून, यामध्ये 17828 विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत मोफत प्रवेश मिळणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातील 646 शाळामध्ये 7005 रिक्त जागा आहे, Thane जिल्ह्यात 627 शाळामध्ये 11326, Chhatrapati Sambhaji Nagar 562 शाळामध्ये 4408 तर Nashik जिल्ह्यात 407 शाळामध्ये 5296 विद्यार्थ्याना RTE अंतर्गत मोफत प्रवेश मिळणार आहे. जिल्हानिहाय शाळा नोंदणी व रिक्त जागा खालीलप्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE 25% Status Report for Academic Year : 2025-2026

तुम्ही राज्यातील ३६ जिल्ह्यातील दिनांक १२ जानेवारी २०२५ पर्यंत RTE पोर्टल वर नोंदणी झालेल्या शाळा RTE Schools आणि RTE Vacancy जिल्हानिहाय खालीलप्रमाणे पाहू शकता.

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे – ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

हे ही वाचा : आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे

RTE Admission 2025 26 : RTE Official Website

आरटीई पोर्टलवर राज्यातील शाळांची नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश

सन 2025-2026 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आरटीई प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरु झाले आहे. सर्व आरटीई 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. अशा स्पष्ट सूचना आरटीई पोर्टल वर देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया ही शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी RTE Admission 2025 26 : RTE Official Website वर अवश्य भेट द्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!