RTE प्रवेश २०२६-२७: निवड यादीतील प्रवेशासाठी शेवटची मुदत; प्रतीक्षा यादी बाबत महत्त्वाची अपडेट

Published On: May 8, 2026
Follow Us
RTE Admission Deadline Extended

RTE Admission Deadline Extended: राज्यातील आरटीई (RTE) २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता वेग आला आहे. शिक्षण विभागाने या प्रक्रियेत पालकांना दिलासा देत प्रवेशासाठी मुदतवाढ दिली असून, आता पात्र विद्यार्थ्यांना ०८ मे २०२६ पर्यंत आपले प्रवेश निश्चित करता येणार आहेत. कागदपत्रांची पूर्तता आणि पडताळणी समितीकडील गर्दी लक्षात घेता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळावी या उद्देशाने ही मुदत वाढवण्यात आली आहे.

RTE २०२६-२७: प्रवेशाची सांख्यिकी सद्यस्थिती

यावर्षी आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले होते. पोर्टलवरील ताज्या डॅशबोर्डनुसार आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

  • एकूण प्राप्त अर्ज: २,८९,२८६
  • निवड झालेले एकूण विद्यार्थी: १,०५,८११
  • प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी: ८६,०३४
  • आतापर्यंत निश्चित झालेले प्रवेश: ७७८१२

केवळ एसएमएसवर अवलंबून राहू नका

प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव अनेक पालकांना मेसेज मिळण्यास विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर, पालकांनी केवळ एसएमएसची वाट न पाहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती‘ (Application Status) या टॅबवर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऍडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पालकांनी मुख्य लॉगिनऐवजी ‘अर्जाची स्थिती‘ या पर्यायाचाच वापर करावा.

प्रतीक्षा यादी (Waiting List) बाबत महत्त्वाची अपडेट

ज्या पालकांचे पाल्यांचे नाव पहिल्या निवड यादीत आलेले नाही, अशा प्रतीक्षा यादी तील विद्यार्थ्यांसाठी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. नियमानुसार, पहिल्या निवड यादीतील (Regular Selection List) विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त जागांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमांकानुसार टप्प्याटप्प्याने प्रवेशासाठी बोलावले जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील पालकांनी देखील पोर्टलवर जाऊन आपला वेटिंग नंबर तपासून ठेवणे हिताचे ठरेल.

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

प्रवेश निश्चितीसाठी जाताना अर्ज भरताना नोंदवलेली सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकित प्रति सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून झाल्यानंतर, आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित झाल्याची पावती (Receipt) घेणे पालकांनी विसरू नये. ही पावती मिळाल्यावरच तुमचा प्रवेश अधिकृतरीत्या पूर्ण झाला असे समजले जाईल.

मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने, निवड यादीतील पालकांनी ८ मे पूर्वी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment