महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (mscepune) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘समूह साधन केंद्र समन्वयक (Kendrapramukh exam) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ (Cluster Resource Centre Coordinator Exam) च्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा डिसेंबर २०२५ ऐवजी जानेवारी/फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित केली जाणार आहे, अशी सुधारीत माहिती परिषदेने एका प्रसिद्धी निवेदनाद्वारे दिली आहे.
केंद्रप्रमुख भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर | Kendrapramukh exam
Kendrapramukh exam: या परीक्षेमुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख (Kendrapramukh) या पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्त होण्याची संधी मिळते.
तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पुढे ढकलली
पूर्वी जाहीर केल्यानुसार ही Kendrapramukh exam दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होणार होती. तथापि, काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
आता ही परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे. परीक्षेच्या सुधारीत तारखा लवकरच परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) प्रसिद्ध केल्या जातील.
अर्ज भरण्याची मुदत वाढवली
परीक्षेच्या तारखा पुढे गेल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १०/११/२०२५ होती, ती आता दि. ०१/०१/२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यामुळे, अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता ही दि. ०१/०१/२०२६ या अंतिम तारखेनुसार विचारात घेतली जाईल. पात्र उमेदवारांनी विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.
केंद्रप्रमुख भरती जाहिरात, शासन निर्णय, अभ्यासक्रम, जिल्हानिहाय जागा येथे पाहा
या बदलांमुळे ज्या शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे आणि ते आता नव्या तारखेनुसार तयारीला लागू शकतात. ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज भरला आहे, त्यांनी Kendrapramukh exam च्या सुधारीत वेळापत्रकासाठी परिषदेच्या https://www.mscepune.in/ या संकेतस्थळाला भेट देत राहावे.



